SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 492
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग छत्तीसावा : ४६७ सर्व करिती नमस्कार । न नमि ते प्रियंगा नार । सर्वी मिळोन बळत्कार । चरनावर लोटले तीसी ॥८॥ श्रावक संगति करोन । तयासी ठावे सुकुज्ञान । म्हणे हा कुतपस्वी कुज्ञान । कुळहीन धीवरनाथ ॥९॥ यासी नमन न करावे । याचे साधन पाप अवघे । पुण्यपाप काशा म्हणावे । नसेचि ठावे पापिष्ठाशी ॥१०॥ ते ऐकोन सर्व हासती । ते पाहोनी तापसचित्ती। हृदयी कोधाची उत्पत्ती । सन्यसयुक्ती न जानेचि ॥११॥ राजसभेसी जावोनिया । मम फिर्याद ऐक राया। जिनदत्त श्रेष्ठीची जाया । आम्हास वाया जल्पती ते ॥१२॥ आम्ही संन्यासी गोसावी । अतीतासी कलंक लावी। तुम्ही तियची खबर घ्यावी । शिक्षा करावी क्षितिपति ।।१३।। ते रायाने सर्व ऐकिले । जिनदत्तासी पाचारिले । दासीसहित येते झाले । नमस्कारिले राया सर्व ॥१४॥ राजा वदे हो श्रावक । तुमची भानोसीनी ऐका। संन्याशासी धीवरनायक । शब्दकलंक लावि त्यासी ॥१५॥ श्रेष्ठी म्हणे प्रियंगा मति । सत्य वदावे निर्भयचित्ती । सभाधीट ते जनमति । राजीयाप्रति वदतसे ॥१६॥ अहो तात ऐकावे सत्य । देवा तापसाचे प्रमित । वश करावे पंचेन्द्रियात । षड्पुि जिंकावे हो ॥१७॥ साहा गोविल तो गोसावी । साहा नाशी संन्याशी म्हणवी। पंचेन्द्रियाची मन गोवी । सुतपे तपवि काया हे वो ॥१८॥ तैसा नोव्हे हा धीवर । मया दृष्ट्वा गंगातीर । मत्स्याचा करीतो आहार । दया अंतर नाही याचे ॥१९॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy