SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 471
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४४६ । आराधना-कथाकोष द्वितीय घट दिल्हा त्यासी । घेवोन चालला गृहासी।। मार्गी झगटला पसुसी । पडता भूमिसी कुपिभंग ॥३१।। तया तुकारिने देखिले । त्वरित तयासि पाचारीले । संचितासि ठेवि बोल । न पोहोचे तेल मुनिराया ॥३२॥ तृतीय कुपि न्यावि त्वरेन । स्वामिसी द्या औषधदान । जे लागल ते देईन । चतुर्थदान पुण्यप्राप्त ॥३३॥ श्रेष्टि कूपिका घेवोनी । स्थिर चालले यत्न करोनी । सद्गुरू समीप येवोनी । वैद्यवचनी तेलस्पर्श ॥३४॥ त्रय वासरा करि लेप । मुनींद्र झाले सुखरूप । कायोत्सर्ग महान् तप । करिती जप पंचगुरू ॥३५॥ जिनदत्त म्हणे अंतरि । परोपकारि ते सुंदरी । उत्तीर्ण व्हावे झडकरी । काही तरी शक्तीनुसार ॥३६॥ घेवोनि सौभाग्य आळिंकार । गेला तुकारिचे मंदीर । यावे हो दादा म्हणे सुंदर । जाले मुनींद्र सुखीकाय ॥३७|| श्रेष्टि म्हणे धन्य तू धने । बाई तुझे अगाधपुण्ये । स्वामी जाले सुखसंपन्न । द्रव्य घेण सुवर्ण काही ॥३८॥ ब्राम्हणी वदे वचन सत्य । दादा नेघे रत्नधनाते । तुर्यदानाचे पुण्यमात । धनकंकरात काशा घेउ ॥३९॥ ऐकोनि तुकारिचे वचन । जिनदत्त म्हणे तू धन्य । मम वचन मान्य करन । धर्मबहिण मम कन्या ॥४०॥ आळिंकार पुढे ठेविला । दोन कुपिका व्यर्थ गेल्या । क्रोध नष्टि तुजसी आला । उपकार केला मजलागी ॥४१॥ दादा क्रोधाचि भोगिली फळ । एकचित्त ऐक निर्मळ । आनंदपूर ते विशाळ । विप्रकुळ मम उत्पन्न ॥४२॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy