SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 466
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग तेहतीसावा : ४४१ तेव्हा ते सर्व विचारीती । चोरासि मैत्रकी करिती । अम्ही तुम्ही मिळोनि प्रीति । करू उत्पत्ति बहु द्रव्य ||५३ || ते वनिक मार्ग धरोन। बैसता आले पांथिकजन । ते पापी पुण्यहीन दीन । हरतील धन तयाचे ॥५४॥ ते धन घेवोनि समस्त | चालले वनि आडमार्गात । जाता दिनकर जाला अस्त । क्षुधातृषाक्रांत जाहाले ते ॥५५॥ भिल्ल भक्षिति कंदमूळ । तत्पत्र अनि सखनाळ । बदरादिक अजानफळ । भक्षिता तात्काळ मृत्य होय ॥५६॥ तयामध्ये सागरदत्त | मनि म्हने हा महाअनर्थ । अन्नपाणि रात्रौ भक्षित । पाप अद्भुत धर्माची हानी ॥ ५७॥ विषप्राशनाते करावे । एकाभविच दुःख भोगावे । क्रियाविरहित भवभवे । दुःख भोगावे जन्ममृत्यु ॥५८॥ सागरदत्त म्हने मानसी । मज भोजन वर्जलीसि । अन्नपाणि अजानफळासी । कल्पांतेसि घेणार नाही ||५९॥ तेव्हा तयाचे ते सांगाती । अजानफळ ते भक्षिताती । अमृतफळे वाचे वदती । श्रेष्टी म्हनती हे अनुचित ॥ ६० ॥ विष प्राशिता गोड लोभ । तैसाच तोहि बचनाग | भक्षिताचि त्या देहभंग । तैसाचि प्रयोग घडला त्या ॥ ६१॥ त्या सर्वासि मृत्य जाहाला । तत् दिनकर उदय जाला । सागरदत्त पाहे धनाला । उदित जाला व्रतयोग ॥ ६२ ॥ ते धन घेउनि शक्तिसार । गृहासी आला महात्वरे । पुत्रपौत्र अनि परिवारे । सज्जेसोयरे धन आस्था ||६३|| एकदा श्री सद्गुरूपासी । श्रावकाचार श्रवण त्यासी । त्रिपनक्रिया दशधर्मासी । ऐकताच त्यासि वैराग्य || ६४ || Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy