SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 458
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग बत्तीसावा : ४३३ क्रोध मान माया लोभ । याचा जाला एकचि डोंब । लिंगावरि करीतो क्षोभ । उपटिला स्तंभ ज्यापरी ॥१४६॥ भिर्काविला दूरस्थवनी । क्रोधे जालि शरीरहानी । मूर्छित पडला धरनि । विपरीत कर्णी देखोनिया ।।१४७।। विद्याबळ लिंग ताठले । पृथ्वीवर ते लोटले । वज्रमय गडबडले । पर्वत जाले पिष्टवत् ॥१४८।। विद्याधरासी हाहाक्कार । विमानारूढ आले इंद्र । ब्रह्मा विष्णु पुरंदर । पाहाति नजर विपरीत ।।१५९।। पृथवीचा दिसतो पाटा । लिंगाचा जाला वरवंटा । विचार पुसती श्रेष्टश्रेष्टा । न्याय उफराटा सांगे विष्णु ।।१५०॥ पंचमकाल कलयुगात । कुकवि मिथ्या स्थापितात । विद्याधर मिळोनि समस्त । भयाभीत पुसताती ते ॥१५१॥ विष्णु म्हणे मी सांगेन । परि न होए तुमचियान । जरी कराल सत्यवचन । भाक देन आम्हासी ॥१५२॥ भाशेष गोविलपर्वतासी । मग चालले पार्वतीपासी। सर्व मिळोनि ते तयसी । शरणांगतासि तारि माय ॥१५३॥ । सर्वासी जीवदान द्यावे । आपुल्या बाळकासि रक्षावे । तुम्ही पृथविसी तारावे । अभय द्यावे पितियासी ।।१५४॥ पार्वती म्हणे विष्णुदेवा । आमुचा की तुला असे केवा । तुम्ही उपाय याचा करावा । स्वर्गदेवा मिटोनि सर्व ॥१५५।। पर्वत विद्याधराप्रति । कृष्ण सांगे वचन युक्ती। पार्वतीस करावि विनती । विष्णु म्हणती ते ऐकावे ॥१५६॥ हरि म्हणे पार्वतीसी । त्रिभुवनशक्ती तुजपासी । आम्ही राहातो स्वर्गवासी । तुसी पृथ्वीसी सांभाळावे ॥१५७।। For Private & Personal Use Only www.jainelibrary.org Jain Education International
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy