SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 432
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग तीसावा । ४०७ ऐसापरी द्वादशगुण । दुलर्भ मानवी कारण । किंचित तू नाही काही पुण्य । भय दारूण जाले त्यासी ॥४१॥ ऋणानुबंध झाला फार । गृही गांजीजाती स्त्री पोर । अन्न न मिळे पोटभ र । ऐसा बेजार जाहला तो ।।४२।। देव गुरू त्या आठवेना । नेमव्रत काही सुचेना। पंचविषय तो सुटेना । चालला वना कंटाळून ॥४३॥ महाख्या वनांतरी । हस्ती धावला तयावरी । पळता जात असे चाचरी । तव व्याघ्र भारी देखे पुढे ॥४४॥ अंधकूप होता तेथे । उडी टाकली त्या अडात । धरोनिया तृणस्तंभात । प्रारंभी तेथ वटवृक्ष ॥४५॥ व्याघ्र हालवी पारंबीसी । मधुमक्षिका डौंसी त्यासी। मधुबिंदु पडे मुखाशी । गोडी रसनेसी लागली ।।४६।। शुभ्र मूषक स्तंभ कोरी । सर्पचार तळी विखारी । एवं संसारसागरी । ऐशा परी महत्कष्ट ॥४७॥ काळहस्ती पाठी लागिला । पंचविषय व्याघ्र आला । संसारांध कूपी पडला । नेक् पापिला मक्षिका तोडिती ॥४८॥ मधुबिंदु गोड संसार । रसनिलुब्ध पाहेवर । पुत्र मित्र द्वयउंदीर । पुण्यमूळ घर करांडीती ॥४९॥ तुर्यसर्प ते चतुर्गती। चौऱ्याशी लक्ष जन्म प्राप्ती। पंचविषये आवरिती । दुःख भोगिती पापी जीव ॥५०॥ जीवा दुर्लभ नरजन्म । जन्मदुर्लभ जैन धर्म । देव दुर्लभ जिननाम । सद्गुरू उत्तम दुर्लभ ।।५१॥ तेव्हा तो ज्ञानांध कूपात । बिमानी इन्द्र पाहिल त्यात । गुरू समान दयावंत । विमानात बैसवे त्वरे ॥५२॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy