SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 416
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग अट्ठावीसावा : ३९१ बोलाविले त्या निमित्यासी । शास्त्रनीति सांगा आम्हासी । तो म्हणे ऐरावतीसी । द्यावा सोंडेसी पूर्णकुंभ ॥ ९१ ॥ तो जाने बत्तीसलक्षणी । ज्या मस्तकी ढाळील पानी । तोचि या नगरीचा धनी । तैसी करणी करी मंत्री ॥ ९२ ॥ हत्ती फिरे सर्व ग्रामात । कोन्ही न दिसे पुण्यवंत । बाहिर नदी तटाकात | वृक्षाखालुत अभिषेक ।। ९३ ।। पूर्वपुण्य देवरतिला । हत्तीन अभिषेक केला । अंबारीवरी स्वार जाला । राजी स्थापिला महोत्सवेसी ।। ९४ । पूर्व सुकृत ज्याचे सिरी । आपदा जाय संपदा दरी । तस्मात् जीवा पुण्यकरी । मोक्ष पायरी पदवी प्राप्त ||१५|| श्रीजिनपूजा अष्टविध । व्रत नेम नानार्थविध | उपास प्रोषध पुण्यार्थं । सुपात्रदान चतुविध ॥९६॥ तदा भूप तो देवरती । मनईछीत सुखप्राप्ती । गुणवंत स्त्रिया बहुती । मुख न पाहती तयाचे ॥ ९७|| दुर्जनान दगा दिला । सज्जन मैत्री करू आला । क्षीर उष्ण जो पोळला । आसार ताला भीतसे ॥ ९८ ॥ तथा राजा तुर्यदान । नित्य नेम देवदर्शन । पूजाविधि सुपात्रदान | स्त्रियामुख नैन न पाहे ॥ ९९ ॥ ते रक्ता पापिनी पंगुसी । रत जाली पापाची रासी । टोपल्यात घालोनि त्यासी । मरता उपासी भीक मागे ॥१००॥ मम भ्रतार पंगु जाला । वस्त्र अन्न द्यावे आम्हाला । सत्य वाटे दयावंताला । पतिव्रतेला द्यावे काही || १०१ || ऐसी ते फिरत फिरत । आलि ते मंगळाख्य नगरात | जनाश्चर्य पतिव्रता सत्य । स्त्री चरित्राते डगाळिली ॥ १०२॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy