SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 402
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग सतावीसवा : ३७७ रायभोग साळिचा भात । दुग्धशर्करा तयावरूत । पोळ्या पातळा पूर्णभरित । शर्कराघृत तयावरि ॥१०४॥ नानापरिच्या कुशंबीरी । मेथूनी कडवट अंतरी । पापड भाजले अरुवारी । फुरका मारि तो बौद्धबाबा ॥१०५।। कढी अत्यंत लागे गोड । त्यात भिजले चुबुकवडे । तळीव तप्त घृतवडे । केळाचे वडे आरूवार ॥१०६॥ तप्त तक्राचि सुंदर कढी । द्रोण भरोनि नीलि वाढी । धोत्र ढिलाविति बुडि । लागली गोडी आत्तासीच ||१०७॥ बारीक जोर साळिभात । मोकळे पुष्पासुवासित । तप्त कढीचा फुर्का घेत । हस्त फिरवित सिखावरि ॥१०८॥ श्लोक वदति वाग्जाळ । गळा तुळसी कंठमाळ । शिष्य म्हणे दीर्घकपाळ । गौरसाळ लोणकडे पै ॥१०९॥ रसनाविषय तो भारी । नेम नाहि जया अंतरी । गोड म्हणे उदरभरि । वरचेवरी मागतसे ॥११०॥ हे मांसाहारी म्हणे दासी । नेमवत नाहि यासी । आंतरज्ञानी आपणासि । या परीक्षेसी पाहा बाई ॥१११॥ म्हणोनिया त्या दासीन । डाव्या पायाची वाहान । वरील वाद्या कातरून । फुटाण्याप्रमाण टुकडे ।।११२।। ते टाकीत तप्त कढीत । ते मवाळ झाले बहुत । ते कढी वाढीता त्यात । गोडी अत्यंत लागली त्या ।।११३।। एक म्हणे आणाहो कढी । येथे काही वाढली थोडी। ते दासि धावधाव वाढी । चर्मगोडी लागली त्या ।।११४॥ ऐसे जेवोनि तृप्त झाले । अंचउनि विडे घेतले । नीलिबाईस बोलाविले । ज्ञान आपुले सांगावया ।।११५।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy