SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 397
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३७२ : आराधना कथाकोष घेवोन त्याचे मुद्रिकेसी । बोलावि निपुणमतिदासि । गुह्य गोष्ट सांगे तियसी । जावे गृहासी प्रधानाचे ॥४५ ॥ त्याचे स्त्रीयसि बोधून । पंचरत्न यावि घेवोन । तत्क्षणि दासी जावोन । पंचरत्न मागे तियसी ||४६ || ते न दे तिचे हस्तकात । दासी सांगे राणीसी गुप्त । राज्ञी म्हणे निपुणमतित खुण तियत दाखवि हे ||४७ || धात्री गेली ब्राह्मणिपासी । तेन दाखवी रत्न तिसी । येवोन सांगे राणीसी । द्रव्यलोभासी जीव गुंते ॥ ४८ ॥ प्रधान जुवा मांडीला । यज्ञोपवीत ठेवि डावाला । तोही फासा जितियला । ब्राह्मण चढला मद गर्व ||४९|| यज्ञोपवीत घेवोन । दासीस वदे गुप्त खुण । तियसी भय दाखउन । पंचरत्न घेउन येन ॥ ५०॥ क्रोध रूप दासि देखलि । ब्राह्मणी मनामध्ये भ्यालि । जानव्याची खुन पाहिली । रत्न दिधलि त्वरेन पै ॥५१॥ मग ते धात्री हर्ष वदने । येता देखिलि ते राणीन । कार्यंसिद्धी जाली संपूर्ण । डाव तियन राहाविला ॥५२॥ रायासी वर्तमान सर्व ऐकता म्हणे हे स्त्रीलाघव । न कळे पुरुषासि अपूर्व । रत्न स्वयमेव पाहिली ॥५३॥ नृपते गुप्त ठेविते जाले । समुद्रदत्ता बोलाविले | द्रव्य घ्यावे रत्नाबदल । वणिक बोले बोल रायासी ॥ ५४ ॥ परद्रव्य विषासमान । न घ्यावे प्राण गेल्यान । माझी मला पाच रत्न । दया करोन द्यावी स्वामी ॥ ५५ ॥ बोलाविले प्रधानासी । सेठे आणिक महाजनासी । पुसता जाला सर्वत्रासी । रत्न चोरासि दंड काय ॥ ५६ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy