SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 395
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३७० : आराधना - कथाकोष समुद्रदत्त पुण्यवान । अनेका झाजि बैसउन । फिरता नगरपाठन । रत्नाकारण सिंहपुरासी ||२१|| तो आला प्रधानापासी । दुरून देखिल तयासी । प्रधान रत्नाभिळाशी त्यासी । सज्यनासी सांगे खुण || २२|| अहो हो पाहा पैलनर । गहिला' दिसे तो किंकर । झाज बुडाले वदे वगत्र । भलते विचित्र मागेल ||२३|| ऐसे म्हणता तोचि आला । पंचरत्नासी मागु लागला । तुम्ही सत्यवादि आम्हाला । सांभाळ केला पाहिजे ||२४|| लोभ धरोनिया रत्नाचा | पाहा लोकानो शब्द साचा । भलतैसच बोल वाचा । चटका जिव्हेचा घ्यावा याचे ||२५|| याचे जाहाज बुडाले । धन सर्व गमाविले । यास धनपीसे लागले । मागु लागले भलतैसे ॥२६॥ समुद्रदत्त करि नमन | माझी देइ पंचरत्न | तुम्ही सत्यवादि ब्राह्मण । आमिस ठेवन न करावे ||२७|| परद्रव्याचा अभिलाष । करिता होए त्या निर्वंश | सत्यवादि म्हणति तुम्हास | सत्यशब्दास भुललो मी ॥ २८ ॥ वारंवार नमन करित । पंचरत्न त्वा द्यावि मात । पापी जीव जे दयारहित । क्रोध त्यात संचरला पै ॥२९॥ दुष्ट निंदनिक जे प्राणि । पापपुण्य न जाने मनी । द्रव्याचा लोभ धरी मनी । खोटी करणी करिताती ॥ ३० ॥ तेव्हा जिनदत्त श्रावका । बाहीर घाला म्हणे सेवका । तो म्हणे लोकानो ऐका । पंचरत्न का माझि सत्य ॥३१॥ ऐसे वादति दोघे जन । राजसभे न्यायकारन । म्हणे माझी पंचच रत्न । तत् प्रधान देइना वो ॥३२॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy