SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 373
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३४८ : आराधना कथाकोष लोक पाहति समस्त । मेळा मिळाला बहुत । जाला अर्थाचा अनर्थ । पृथ्वी फाटत तत्समई ॥९२॥ राजा सिंहासनासहित । गर्क झाला कंठपर्यंत । जैसा तो अपे अपघात । भ्रमर बैसत कमळानि ॥९३।। नारद म्हणे आता तरी । सत्य वदावि वैखरी । सत्य ते तारी सत्य मारी । पाप पदरि न घ्यावे रे ॥९४॥ तेव्हा कंठ दीर्घ करून । पर्वतवचन सत्य म्हणे । तत् गिळिला धरत्रीन । पाप दारुण हिंसेचे पै ॥९५॥ श्लोक : असत्यसहिता हिंसा मिथ्यावचन दृश्यते । अष्टांग यत्र सम्यक्त्वं दर्शनं तत् हि शुद्धिदं ।।९६।। टीका-असत्येन हिंसा होति । मिथ्यावचने तेच गति । अष्टांगे जे का सम्यक्त्वि । त्रिशुद्धि घेताती दर्शन ॥९७।। हिंसा दोष लागला त्यासी । गेला तो सप्तम नरकासी । जय झाला नारदामी । श्रावकजनासी आनंद ॥९८॥ पापे करिता क्षय होत । पुण्य कर्ता लक्षुमी प्राप्त । देही राया कळत होत । वरद हस्ते भस्म जाला ॥९९॥ तेव्हा ग्रामजनाचा मेळा । बोलविल त्या कुळाळा । गर्दभ आनि रे चंचळा । मिळाला मेळा ग्रामपोर ॥१०॥ गर्दभारोहण पर्वत । धूळ शेण मार करित । ग्रामाबाहेर गेला पळत । अरण्यात पापरूपि तो ॥१०१॥ पूजनीक नारद जाला । जैजैकार प्रवर्तला। राजपुत्र राजि बैसला । जैनधर्माला करिति लोक ॥१०२॥ तस्मात् प्राणक्षय होय । असत्य वचन बोलु नय। यश जावोन अपयश । अपकीर्ति होय जगात ॥१०३॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy