SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 288
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग विसावा : २६३ ऐशापरि नेमिक झाले । सर्व अपुल्या गृहा आले । सुदर्शन तपस्वी जाले । शास्त्र पढले आगमतत्त्व ॥ १७७॥ मम गुरुआज्ञा घेवोन । एकलविहारी होऊन । यात्रा तीर्थ सिद्धस्थान । तीर्थाटन करिताती ते ॥ १७८॥ ऐसा धर्मोपदेश करीत । पाडळीपुर चैत्याल्यात | भ्रामरि करोनि जाता ते । दासीन अवचित देखिले ॥। १७९ ।। पंडिता सांगे वेश्येसी । पाहाया तू सुदर्शनासी । यान हारविले राणिशी । जाला तपस्वी रूपवंत ।।१८० ॥ देवदत्ता कळवातीन । प्रियंगा दासी विचक्षण । घेवोनि आलि त्याकारण । पलंगी नेवोन बैसवी ॥ १८१ ॥ देवदत्ता म्हने वो स्वामी । रूपवंत तरूण तुम्ही । भोग भोगावे घराश्रमी । तुम्हायोग्य आम्ही नायिका ॥ १८२ ॥ मुनी म्हने ऐकावे बाई । देह अपवित्र सर्वही । याचा भोग करावा काई । दुःखदाई जीवाकारण || १८३॥ संन्यास घेवोन तप करावे । कर्म खंडोन मोक्षा जावे । तुम्ही आम्हा न छेड़ावे । सुखी असावे संसारी ॥ १८४ ॥ वेश्या म्हणे अहो तापसी । आता भोग द्यावा मजसि । मग तुम्ही जावे तपासी । न सोडू तुम्हासी भोगाविना ॥ १८५ ॥ मुनी सर्वसंन्यास करी । मौन धरोनि अंतरी | स्त्रियाचरित्र नानापरी । उपसर्ग करि लैनिसि ॥ १८६॥ वेश्या जाली ते स्वेदक्षीण । न चळे मेरूसमान । स्मशानी ठेवला नेउन । पत्यंकासन कार्योत्सर्ग ॥ १८७॥ तेथे होती ते व्यंतरी । तयासि आला क्रोध भारी । म्हणे हा माझा पूर्ववैरी । उपसर्ग करी अनेक || १८८|| Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy