SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 283
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २५८ : आराधना - कथाकोष तव ते बोले सुंदरनारि । माझा मनोरथ पूर्ण करि । सुदर्शन भोग मम अंतरि । कैशाही परि आनि बाई ॥११७॥ दाई म्हणे हे पाप थोर । आनि तो रायाचा सावकार । जैनधर्मी नेमीक फार । शीळवंत चतुर ज्ञानी पै ॥ ११८ ॥ तो न लागे तुझे हाती । राणि म्हणे तू जाय परती । प्राण तजिन हातोहाती । भ्यालि चित्ति तयेची धाय ।। ११९ ।। म्हणे धीर धरि गे सगुणे । सेटि कैशापरि आणने । सप्त दरवाजे रक्षणे । राणि म्हणे काही न सांगावी ॥ १२० ॥ तयासि देवोनि अभय । दासी करीतसे उपाय । म्हणे आता करू काय । विचारी धाय मनात ॥ १२१ ॥ कुलाला घरी जावोनिया । सप्त पुतळे करोनिया । रंगवस्त्र घालोनिया । एक घेवोनिया चालली ॥१२२॥ प्रथमद्वारि म्हणे हे काय । दासी म्हणे पुससी काय । राणीच तुला नाही भय । करिशील काय आमचं ।। १२३ ।। पुढे चालली धीटपणं । पल्लव धरिला तयाने । पुतळा दिधला सोडोन । गेला फुटोन रस्त्यामध्ये ॥ १२४ ॥ मग ते रडू लागली । स्त्रियाची जात कवटाळ । अरे रे दुष्टात्वा फोडली । उपासी राहेली बाईजी ॥। १२५ ।। राणिच्या व्रताचा पुतळा । त्वा फोडला रे चांडाळा । आता मरण आले तुला । जाउन बाईला सांगते मी ॥ १२६॥ तेव्हा त्यासी भय उत्पन्न | पाया पडे दीनवदन । जे मनसि ते ऐकेन । भाक घेन माझी बाई गे ।। १२७ ।। ऐशापरि तो केला वश । सप्तद्वार सप्तदिवस । तव अष्टमीचा दिवस । असे उपास सुदर्शना ॥ १२८ ॥ | Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy