SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 209
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १८४ : आराधना - कथाकोष अता हे पोरट आपुल घेन । याचे करावे त्वा पाळन । ऐसे बोलोनि कठोर वचन । पदाग्रि ठेवोन गेले सर्व ॥ ५६ ॥ व्याघ्र - सिंह तथा वनि । निर्दय बाळ दिल्हे टाकुनि । स्त्रियाचि जात महाकपटी । करति करनि अगोचर ॥ ५७ ॥ जे स्वामिचा द्वेश करिति । ते संसारासि नतरति । नानाप्रकारे दुःख भोगिति । शेवटि जाति नर्कासि ॥ ५८ ॥ ऐसे न करावे भव्य प्राणि । गुरूकृपा संपादुनि । लीन व्हावे गुरूचरनि । स्वर्गभुवनि सुख पावे ।। ५९ ।। असो त्या पर्वतावर | काय वर्तला विचार । ते परिसा सज्जन चतुर । पुण्य थोर त्या बाळकाचे ॥६२॥ यानंतर अमरावती । नगरीचा जो खगपति । दिवाकर देव भूपति । कलह करिति त्या कुटुंबि ॥ ६१ ॥ लघु भ्रात पुरंदर देव । मर्यादा टाकुन ज्ञानगर्व । । घेवोनि वडिलाचे राज्यवैभव । घेवोनि सर्व दुन्हाविला ||६२ || पश्चात्ताप करि हृदयी । पूर्वी पुण्य मी केले नाही । आता तरी करू काही । पुण्याचि सोय पाहे मनि ॥ ६३ ॥ स्त्रीसह विमानी बैसोन । यातेसी चालला तेथोन । कैलासगिरिसि जाउन । केले नमन आदिनाथा ॥ ६४ ॥ तेथोनि समेदशिखर । भव्यजीवाचे मोक्षमाहेर । वंदिता पुण्य अपार । कुगति असार चुकति ॥ ६५ ॥ वासुपूज्य चंपापुरि । वंदुनिया पावापुरि । महावीर पद्मसरोवरि । वंदना करि खगपति ॥ ६६ ॥ मग तेथोनि सोरट देश । गिरिनेर वंदावयास । वसुविध पूजा सावकास । करिता नाश पापाचा ॥। ६७ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy