SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 206
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग तेरावा : १८१ 1 म्हणे हा सदबुधि गुणवंत । मंत्रिपद देवोनि तयात । कीर्ति वाढलि जगात । राज्याप्रजात सुखदाइ ॥२०॥ सुभूति मातुळ पाहोनि । संतोष झाला अंत: करणि । यज्ञदत्ता कन्या मृगनयनि । दिधलि प्रनुनि तयासि ॥ २१ ॥ कीत्येक दिवस उपरि । यज्ञदत्ताचे गर्भ उदरि । डोहाळे होतात नानापरि । पूर्ण करि प्रिय कांत ॥२२॥ एके दिवस ते वेल्लाळ । पतिस मागे अमृतफल । स्वभाव स्त्रियाचा आकळ । वर्षाकाळ अवऋतूत ||२३|| तेव्हा तो स्त्रीप्रीतिधरोन । प्रेत्न करिता सायासान । आम्रवनात्येक नयन । फळ संपूर्ण परिपक्व ||२४|| त्या तळ सुमित्र नामे मुनि । तयाचे अतिशय करोनि । नानाफलपुष्पशोभा वनि । जिनधर्मं जनि शुभकर्ता ॥ २५ ॥ ते देखोनिया द्विजवर । म्हने हा तपस्वि मुनिवर | पुन्यातिशय असे थोर । फळपुष्पभार षडऋतु ||२६|| नमन करि साधुसंता । रसाळफळ घेवोनि हस्ता । ते देवोनिया यज्ञदत्ता । स्त्रीमनोरथा पूर्ण केले ||२७|| मग आम्रवनि येवोनिया । नमन केले सद्गुरुपाया । स्वामिसंमुख बसोनिया । प्रश्न पुसावया उद्योगी ॥ २८ ॥ "" भो मुने ! करुणासागर | भुवनत्रइ काय सार । ते वदावे श्री पूज्यवक्त्र । मम श्रोत पवित्र इच्छामि " ॥ २९ ॥ ते ऐकोन करुणावचन । मुनिराज वदे ज्ञानसंपन्न | बरवा केला त्वा प्रश्न । स्वर्मोक्षकारण ज्याचेनि ॥ ३० ॥ यैलोक्यात जे सारश्रेष्ठ | जिनधर्म असे वरिष्ट । केवळ वानि झालि प्रगट । मार्ग नीट स्वर्मोक्षाचा ||३१| Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy