________________
प्रसंग अकरावा : १५५
तदा ते युग्ममुनि । जावोन चेलना गृहांगनि । उभे राहिले तयस्थानि । चेलना उठोनि नमोस्तु केला ॥१४७|| म्हने दया करोनि मजवरि । स्वामि सुद्धासनावरि । तिष्ठावे एक क्षणभरि । वदावे अंतरि असे कारण ||१४८|| तत्प्रार्थना आइकोनि वहिला । विरागासनि जावोनि बैसला । माताप्रति वदु लागला । मम कार्याला सिघ्र साधि ॥१४९॥ अंबे मम अंत:पुर । स्वरूपे महामनोहर । देवांगनाहोनि सुंदर । आनोनि सत्वर मज दाखवि ।।१५०॥ पुत्रवाक्य ऐकोनि जननि । विचारीत असे निजमनि । किं हा चळला चारित्राहुनि । स्वगृही म्हनोनि आला असे॥१५१॥ तदांतःपुरामाजि जाउनि । वदे बत्तीस वध्वालागुनि । तुमचे पुण्योदय करोनि । तव स्वामि सदनि आला असे ।।१५२॥ तुमचे स्वरूप पाहाव्यासि । फार उत्कंठा' असे मानसि । आता चालावे लव लाहेसी । आनंद मानसि धरोनिया ॥१५३॥ स्वसवाक्य आइकोन । हर्ष पावल्या गहन । सर्वांग रोमांचित होऊन । चंद्रवदन विकासिले ॥१५४॥ मग त्वरे करोनि शृंगार । कंठि फुड चंद्रहार । पटकुले नेसोनि मनोहर । पदि नेपुर झंझन वाजति ॥१५५।। आधीच होत्या स्वरूपवंता । राजकुलीच्या राजसुता। शृंगार केला त्याजवरुता । काय वर्णावे रूप त्याहाचे ॥१५५।। देवांगनासि आनिलि हारि । चक्रवतिचि सुभद्रा नारि । रंभा उर्वसि मनोहरि । स्वरूपे थोरि थोरि जिंकिल्या ॥१५६।।
७. इच्छा, ८. लौकर.
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org