________________
४.१
(५) ४. भौगोलिक विशेषता ह्यांत भौगोलिक नावामध्ये सर्वात मोठा परिचित भूभाग म्हणून जंबुद्वीपाचा निर्देश आहे. त्यांत जंबु म्हणजे जांभळाच्या झाडांचे बाहुल्य असले पाहिजे. त्यात सात क्षेत्रे व सात पर्वत आहेत ही मान्यता आली आहे. परंतु क्षेत्रामध्ये भरत, ऐरावत, विदेह व उत्तरकुरु व पर्वतामध्ये हिमवत् व सुदर्शन मेर ह्याचा उल्लेख आहे. हिमवत् त्याच्या वैशिष्ट्यामुळे सर्वांच्या परिचयाचा आहे. सुदर्शन मेर म्हणजे सध्याचे पामीरचे पठार असले पाहिजे. त्याठिकाणापर्यंत जिनधर्मानुयागाची ये-जा प्राचीनकाळी असली पाहिजे. खंडामध्ये आर्यखंड व म्लेंच्छखंड असे भेद केले आहेत. जेथे जीवनकलह उन नाही ते आर्यखंड व जेथे जीवनकलह उग्र आहे ते म्लेंच्छखंड असा हिशेब असावा. म्लेंच्छखंडामध्ये धर्म, धर्मायतन, साधु, साध्वी, व्रत व नेम इत्यादिकाचा आचारविचारांचा लोप असतो असे वर्णन आहे. द्वीपामध्ये रत्न सापडणारे द्वीप होते. लंका द्वीप दक्षिणेकडील सीमा म्हणन प्रसिद्ध असावे. नंदीश्वरद्वीप हा विषुववृत्तावर असणारा बारमाही प्रदेशाचा प्रदेश असावा. त्यामुळे तेथील वर्णन त्या प्रदेशाला साजेसे आहे. तेथील जाण्यायेण्याची वहिवाट कधी व का तुटली हे नक्की सांगता आले नाही तरी एके काळी लोकांचे तेथे जाणेयेणे होते हे स्पष्ट आहे. समुद्रसपाटीपेक्षा कमी किंवा खोलगट प्रदेशाला नागभुवन म्हणण्याचा प्रघात होता असे दिसते. तेथे नागवंशाचे लोक राहात असतील. तेथील नगरे, स्त्रिया व बावड्या ह्यांचे वर्णन कुठे कुठे आढळते. सर्व कथात मिळून ३२ देशांचा उल्लेख आहे. त्यात पूर्वेकडच्या अंग, कलिंग, गौड, मगध, पश्चिमेकडच्या आभिर, कच्छ, लाट, सोरट, उत्तरेकडच्या कुरुजांगल, गंधमाली, टक्क, सूरसेन, दक्षिणेकडील अंध्र, उंडू, करनाटक, तेलंग, द्रविड, मलय, तर
४.२
४४
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org