SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 411
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ गणिनी आर्यिकारत्न श्री ज्ञानमती अभिवन्दन ग्रन्थ [३४९ पौर्णिमे चा चंद्र - सौ० शोभना शहा, (बी०ए०) अकलूज [महाराष्ट्र] सन् १९३४ मधील शरद पौर्णिमेची रात्र होती. चंद्र आपल्या संपूर्ण कलेने प्रकाशित होता. आपल्या दुग्धधवल अमृतकिरणांचा वर्षाव मनुमुरादपणेध्धरतीवर करीत होता, आणि त्याचवेळी सूर्यालाही खिजवित होता, "अरे रविराजा! दिवसभर आपल्या उष्ण उष्ण किरणानी सा-या सृष्टीला ताप देतोस तिला त्रासवून टाकतोस. तिचा करुण विलाप मला सहन होत नाही, ऐकवत नाही. आणि म्हणूनच मी माझ्या शीतल किरणांचे पांघरुन तिच्यावर टाकून तीचा दाह कमी करतो आहे. तेव्हा कुठे सर्व लोकाना शांत, सुखासमाधानाची झोप लागते. बिचारे मला किती किती धन्यवाद देत असतील आणि आता तर शरदऋतुचेही आगमन होत आहे. सारी सृष्टी-शांत-शीतल झालेली आहे. तापदायक अशा उष्णतेचा प्रवेशही होणार नाही. महिनाभर तरी. आजतर मला खूप खूप प्रसन्न वाटतय. माझ्या असंख्य किरणामध्ये थेंबाथेंबाच्या रूपांत किती सारे अमृत भरले आहे. हे अमृत सा-या सृष्टीत वाटून टाकणार आहे. हे प्राणिमात्रानो। तुमची इच्छा असेल, शक्ति असेल तेवढे अमृतकण आपल्या सर्वागामध्ये साठवून घ्या. आपल्या नयनानी हे अमृतकण आकंठ पिऊन घ्या. आजची संधी सोडून देऊ नका, कारण आजच्या नंतर मी पुनः? वनिच असा अमृत खजिना घेवून येणार आहे. तो पर्यंत जेवढा जमेल तेवठा साठा करून घ्या. वा। माझी मनोकामना लोकापर्यंत पोहोचलेलो दिसते. पहा । पहा । सारेजण आपल्या गच्चीवर बागेत, उघडया मैदानात जमले आहेत. दूथ निरनिराळे पकवाने घेऊन आले आहेत. सारे पदार्थ अनावृत्त करून ठेवले आहेत. त्यामुळे माझे अमृतकण त्यात प्रवेश करतील. लोक ते दूध प्राशन करतील, मिष्ठान्ने सेवन करतील, आणि माझे अमृतकण आपल्या तनमनात सामावून घेतील. अरे। पण आज माझे सर्वाट रोमांचित का होत आहे? अनामिक अशा सुखसंवेदनाची अनुभुतो का होत आहे? कांहीतरी विशेष मंगलमय घटना घडणार आहे काय? स्याची ही नांदी असावी कां? कुठल्या तरी अलौकीक स्वरूपाचे दर्शन घडणार आहे काय? कारण अलीकडे ब-याच वर्षात अशी संवेदना मला झाली नव्हती. __ओहो ! पहा ! पहा ! धरतीवर त्याठिकाणी एक तेजोमय वक्तव्य मला दिसू लागल आहे. नक्कीच तेथे कांहीतर मंगलमय असणार चला जाऊ या तेथे काय आहे ते पाहू या. ही तर टिकैतनगरी आणि हा प्रासाद श्रेष्ठी धनकुमारजीचा या धरातले सारे स्त्री पुरुष एवढी रात्र झाली तरी बैचेन होवून कशाची तरी वाट पहात आहे. पुरुषमंडळी बाहेर अंगणात येरझा-या घालीत आहेत. स्त्रिया माजघरात आत बाहेर करीत आहेत. ___ बरोबर आहे. धनकुमारांची लाडकी सून-पुत्र छोटेलालची धर्मपत्नी-मोहिनी देवी-भावी अपत्याच्या जन्माच्या प्रसववेदना सहन करीत होती. मनामध्ये णमोकारमंत्राचा जप चालू होता. फार वेळ वाट पहावी लागली नाही. आतून तान्हया जीवाच्या रडण्याचा आवाज आला. सर्वाच्या नजरा उत्सुकतेने प्रसुतिकक्षेकडे वळल्या. काय झाला असाव? मुलगा की मुलगी? येवढयांत आतून सुईनबाई धावत आल्या. "मुलगी झाली हो." क्षणभर शांतता पसरली नाराजीची हलकी लकेर मनातून अधावत गेली. सर्वात आधी आजी भानावर आल्या. सर्वाना सावरत त्या हर्षभराने ओरडल्या . "अरे बघता काय? पौर्णिमेचा चंद्र घरात जन्माला आलाय. पहिली बेटी धनाची पेटी. जावा, जन्मोत्सव साजरा करा. मंगलगीत गावा, गोरगरीबाना दान करा." सारेजण आजीच्या शब्दाने भानावर आते. प्रत्येकाच्या अंगाअंगात चैतन्य संचारले. आजीची आज्ञा शिरसावंध मानून उत्साहाने कामाला लागले. आजीचे म्हणणे खोटे नव्हते. खरोखरच घरांत पौर्णिमेच्या चंद्रासारखी सुंदर कन्या जन्माला आली होती. येणारे जाणारे तिच्याकडे कौतुकाने पहात. तिची मुक्तकंठाने प्रशंसा करीत. इतरांच्या मुखातून आपल्या कन्येची प्रशंसा ऐकून मोहिनी देवीचा ऊर धन्यतेने भरुन येई या मातृत्वाने स्त्री जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटे. ___ मोहिनीदेवीची जिनेंद्रदेवावर अत्यंतिक श्रद्धा होती. जेंव्हा ती माहेराहून प्रथम सासरी निघाली तेंव्हा तिला निरोप देताना तिच्या पिताजीनी "पद्मनंदि पंचविंशतिका" हा ग्रंथ दिला होता. आणि मोठया प्रेमाने तिला सांगितल होत "बेटा! या ग्रंथाचा स्वाध्याय, तू रोज भक्तिपूर्वक करीत जा. तुझे कल्याण होईल." Jain Educationa international For Personal and Private Use Only www.jainelibrary.org
SR No.012075
Book TitleAryikaratna Gyanmati Abhivandan Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorRavindra Jain
PublisherDigambar Jain Trilok Shodh Sansthan
Publication Year1992
Total Pages822
LanguageHindi
ClassificationSmruti_Granth
File Size26 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy