SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 417
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २१२ आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ अन्यसहायनिरपेक्ष होऊन परमात्म्यातच लीन व्हावे. या ध्यानात सुरुवात पृथक् विचाराने पण अन्ती ध्येय व ध्याता एकरूप होतात. त्यानंतर स्वतःच्या आत्म्याला परमात्म्यामध्ये योजतो. कर्मरहित आत्मा व्यक्तिरूपाने परमात्मा व कर्मसहित आत्मा शक्तिरूपाने परमात्मा आहे. अमूर्त अनाकार अशा परमात्म्याचे ध्यान या ध्यानात करावे. याप्रमाणे सिद्धपरमेष्टीच्या ध्यानाने त्यांच्याप्रमाणे व्यक्त रूप होण्याकरता त्याच्यात लीन होतो. ह्याप्रमाणे बाह्य व अभ्यंतर सामग्रीने म्हणजे प्रथम तीन संहनन व वैराग्यभाव असणारा योगी शुक्लध्यानपात्र होतो. ह्या धर्मध्यानाने कर्मक्षय, क्षायिक सम्यग्दृष्टीपासून अप्रमत्तगुणस्थानपर्यंत असंख्यातगुणी निर्जरा होते. ह्याचा उत्कृष्ट काल अंतर्मुहूर्त आहे. भाव व क्षायोपशमिक लेश्या शुक्ल, प्रसन्नचित्त, कांतिमान, सहृदय, सौम्य व शांत प्रवृत्ती ही ह्याची चिन्हे आहेत. नवप्रैवेयक, नवअनुत्तर व सर्वार्थसिद्धीमध्ये उत्तम देव होतात. व शुक्लध्यान प्राप्त करून मोक्ष मिळवितात. शुक्ल ध्यान-धर्मध्यानपूर्वकच शुक्लध्यान होते. जे क्रियारहित, इंद्रियातीत ध्यानधारणेने रहित स्वरूपसंमुख आहे ते शुक्लध्यान. वज्र-वृषभ-नाराच-संहनन, ११ अंग चौदा पूर्वधारी शुद्ध चरित्रवान् मुनी शुक्लध्यानयोग्य ध्याता होय. कषाय मलाचा क्षय किंवा उपशम होत असल्यामुळे हे शुक्लध्यान होय. पृथक्त्ववितर्क विचार, एकत्ववितर्क अविचार, सूक्ष्मक्रियाप्रतिपाती व व्युपरताक्रियानिवर्ती हे चार प्रकार आहेत. पहिले दोन शुक्लध्यान छमस्थाला, अर्थसंबंधाने, श्रुतज्ञानाच्या अवलंबनाने होतात. पहिले पृथक्त्ववितर्कविचार हे ध्यान पृथक्त्व, वितर्क व विचारसहित आहे. पृथक् पृथक् रूपाने श्रुताचे संक्रमण होते म्हणजे वेगवेगळे श्रुतज्ञान बदलते म्हणून सपृथक सवितर्क व सविचार रूप आहे. __ ज्या ध्यानात श्रुतज्ञानाचा विचार होत नाही. एक-रूप राहते ते एकत्ववितर्क अविचार ध्यान होय. ह्यात अनेकपणा म्हणजे पृथक्त्व श्रुतज्ञान म्हणजे वितर्क व अर्थ, व्यंजन व योगाचे संक्रमण म्हणजे विचार होय. एका अर्थावरून दुसऱ्या अर्थावर ती अर्थसंक्रांतीने एका व्यंजनाहून दुसऱ्या व्यंजनावर व व्यंजनसंक्रांति एका योगाहून दुसऱ्या योगावर स्थिर होणे ही योगसंक्रांती होय. ह्या दुसऱ्या ध्यानामध्ये स्थिर असणारा योगी क्षणात कर्माचा उपशम किंवा क्षय करतो. व हे ध्यान पृथक्त्वध्यानपूर्वकच होते. ह्याचा ध्येय विषय, एक द्रव्य वा एक पर्याय वा एक अणु व एकाच योगाने चितवन करतो. व जेव्हा ह्या ध्यानात संक्रमण होत नाही तेव्हा बाकी राहिलेल्या घातिया कर्मांचा मूलतः नाश करतो. तिसरे शुक्लध्यान सूक्ष्मक्रिया प्रतिपाती. ह्यांत उपयोगाची क्रिया नाही पण काययोग विद्यमान आहे. व ह्या काययोगाची क्रिया कमी कमी होऊन सूक्ष्म राहते तेव्हा हे ध्यान होते. हे ध्यान सयोगकेवलींना होते. अरहताचे अन्तमुहूर्त आयुष्य शिल्लक असतांना बाकीच्या तीन कर्मांची स्थिती कमी अधिक असल्यास समुद्धात विधि करतात. उत्कृष्ट सहा महिने आयुष्य कमी असताना जे केवली होतात ते अवश्य समुद्धात करतात. व सहा महिन्यापेक्षा जास्त काळ शिल्लक असतांना केवल समुद्धात विकल्पाने करतात. व अंतमुहूर्त आयुष्य शिल्लक असतांना आयुकाएवढी वेदनीय, नाम, गोत्र ह्या कर्माची स्थिती जेव्हा होते तेव्हा सर्व वचनयोग, मनोयोग, व बादर काययोग सुटतो व फक्त सूक्ष्म काययोगाच्या अवलंबनाने परिस्पंदन होते, म्हणून सूक्ष्मक्रिया-प्रतिपाती ध्यान होते. आयुकर्माची स्थिती बाकी कर्मापेक्षा जास्त असल्यास आत्म Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org.
SR No.012022
Book TitleAcharya Shantisagar Janma Shatabdi Mahotsav Smruti Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
PublisherJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
Publication Year
Total Pages566
LanguageHindi, English, Marathi
ClassificationSmruti_Granth & Articles
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy