SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 189
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १६० आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ लागत असे. महाराजांचा दृष्टिकोन अध्यात्मिक असल्यामुळे त्याच द्वारा लोकांचे निरसन करून लोकांची भूक शमवीत असत. एकदा फलटण येथील दिगंबर परंतु कबीर पंथी श्री. जिवराजभाई केवलचंद दोशी पू. महाराजांचे दर्शनास गेले. त्यांचाही अनेक बाजूंनी सर्व धर्मांचा अभ्यास झाला असल्यामुळे सहसा परीक्षा घेतल्याशिवाय कोणास नमस्कार करीत नसत. पू. महाराज संघासहित बसले होते व श्री. जिवराजभाई महाराजांचे जवळ नमस्कार न करता बसले. महाराजांचे मनात कोणताच विकल्प नव्हता, परंतु जवळच चंद्रसागर महाराज बसले होते, त्यांनी श्री. जिवराजभाईंना आपल्यास काही विनय व्यवहार कळतो का ? वगैरे म्हणून जागृति दिली. त्यामुळे जिवराजभाईंची प्रतिभा स्फुरण पावली. त्यांनीही तेथेच लगेच उत्तर दिले, अशी माकडे मी अनेक पाहिली आहेत. त्यावर पू. आचार्य महाराजांनी श्री. जिवराजभाईंना जवळ. बोलावून शांततेने त्यांची विचारपूस केली, त्यावेळी ते म्हणाले की मी बडोदा येथे रिशालेत होतो. तेव्हा महाराज म्हणाले की, तुम्हास जंगलात वगैरे जाणेचे प्रसंग येत असतील. जंगलात तुम्हास एखादा काटा टोचला तर तुम्ही तो कसा काढता ? तेव्हा जिवराजभाईंनी उत्तर दिले, काट्याने काटा काढतो. तेव्हा महाराज म्हणाले की तू म्हणतोस ते अगदी खरे आहे. बाळा, खरा पारखी तूच आहेस. आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यावयाची असेल तर माकडेच व्हावे लागते. त्याशिवाय खरे आत्मकल्याण होत नाही. अशा प्रकारे त्यांचे बोलणे होऊन महाराजांनी जिवराजभाईंना खऱ्या स्वरूपाची जाणीव काट्याने काटा काढावा या उक्तीने जाणीव करून दिली व ती जीवराजभाईंच्या अंतःकरणास बरोबर जाऊन भिडली. तेथेच त्यांनी महाराजांची क्षमा मागून साष्टांग नमस्कार करून आपली जीवनाची भूमिका बदलून टाकली; व अंतसमयी त्यांनी श्रद्धेने णमोकार मंत्राचे स्मरण करीत आपली मनुष्यजन्माची सार्थकता करून स्वर्गस्थ झाले; व अंतसमयी त्यांनी आपल्या पुंजीचा उपयोग श्री १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र सं.. दहीगाव येथे यात्रेच्या वेळी जे लोक येतात त्यांच्या अन्नदानात खर्च व्हावी म्हणून आपले भव्य भाव प्रगट. केले व त्या वेळेपासून दहिगाव येथे अन्नदानाचे सत्र आजतागायत अव्याहतपणे चालू आहे. चारित्रचक्रवर्ती पूज्य आचार्य शांतिसागर महाराजांचे पुण्यस्मरण पद्मश्री . सुमताभून आचार्य शांतिसागर महाराजांच्या पुनीत सहवासातील आठवणी मनात सारख्या घोळत राहतात.. त्यांतील काहींचा निर्देश करण्याचे योजिले आहे. सहज सांगितले ते पटले ते पावसाळ्याचे दिवस होते. माझे वय आठ वर्षांचे होते. माझे आईवडील व आत्या त्यांच्याबरोबर मीही आचार्य शांतिसागर महाराजांच्या दर्शनास सांगली जिल्ह्यातील समडोळी गावी गेले होते. आचार्य महाराजांचा निवास समडोळी गावाबाहेर ३ | ४ फर्लांग अंतरावर एका गुंफेत होता. रोज दुपारी मी आत्याबरोबर Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.012022
Book TitleAcharya Shantisagar Janma Shatabdi Mahotsav Smruti Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
PublisherJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
Publication Year
Total Pages566
LanguageHindi, English, Marathi
ClassificationSmruti_Granth & Articles
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy