SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 186
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ स्मृति-मंजूषा 'आम्हास माहीत नाही.' 'मग उपाध्यायास कसे माहीत ?' नंतर महाराजांनी श्रावकांना गृहस्थाने मुनींना स्वहस्ते आहार कसा द्यावा, परहस्ते न देता आपल्या 'घरी आहार द्यावयाचा विधी समजावून दिला. हाच विवेक महाराजांच्या संयमी जीवनाचा गाभा होता. ३. विवेकपूर्ण सजीव प्रकाश समाजाचे धर्मविषयक प्रश्न उपस्थित झाले असताना त्यातही त्यांच्या विवेकदृष्टीचाच प्रत्यय येतो. महाराजांचा चातुर्मास फलटण मुक्कामी सं. २०१० साली होता. मी पण महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. एक गणमान्य विद्वान....महाराजांकडे दर्शनासाठी देवळातून पूजन वगैरे आटोपून येत होते. हातामध्ये अष्टद्रव्य सामग्री होती. महाराज कुटीबाहेर पाटावर बसले होते. त्यांनी महाराजांना सविनय वंदन केले व त्यांच्या चरणाला गंध, फुले चढविण्याकरिता गंध घेऊन हात पुढे केला. परंतु महाराजांनी पाय आत ओढून घेतले. पू. महाराज म्हणाले 'आप तो विद्वान हो. कही साधु को गंध और फूल का परिग्रह होता है क्या ?' तेथेही उपस्थितांच्या प्रत्ययाला वागण्यातील सूक्ष्म विवेक आला व सर्वांनाच प्रकाश लाभला. :४: म्हसवड येथील प्रतिष्ठेच्या वेळी महाराजांकडे पंडित श्रावक वगैरे सर्वच बसले होते. श्री. कानजीस्वामींच्या आध्यात्मिक उपदेशाचा प्रभाव वाढत होता. सर्वत्र निश्चय व्यवहार निमित्त उपादानाची चर्चा होत होती. त्याचे प्रतिबिंब महाराजांभोवतीच्या चर्चेतही उमटत असे. पंडित लोक म्हणाले " महाराज समाज में तो कानजी के आत्मधर्म ने गहजब मचाया है। उनकी समयसार की एकान्तिक प्ररूपणा से बडी गडबडी होगी। व्यवहार धर्म का और सच्चे धर्म का लोप होगा। इस समय आपका आदर्श ही समाज को बचा सकता है। इसलिए आप आदेश निकाले और उनकी प्ररूपणा धर्मबाह्य है ऐसा जाहिर करे...." __ महाराजांची मन्दकषाय प्रवृत्ती त्यांना नवीन भानगडी उपस्थित करू देत नव्हती. तसेच त्यात हस्तक्षेपही करू देत नव्हती. महाराज ऐकून गप्प बसले. परंतु पंडितजींचा आणि अन्य काहींचा फारच लकडा दिसला. बऱ्याच वेळानंतर महाराज म्हणालेत, “अगर मेरे सामने प्रवचन के लिए समयसार रक्खा जाएगा तो मैं भी क्या और कोई भी क्या वही तो मुझे कहना पडेगा । पुण्यपाप को हेय हि बतलाना होगा । यही समयसार की विशेषता है।" "अब रही बात व्यवहार की । व्यवहारधर्म की जीवन में उपयोगिता कैसी है यह बात कानजी Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.012022
Book TitleAcharya Shantisagar Janma Shatabdi Mahotsav Smruti Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
PublisherJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
Publication Year
Total Pages566
LanguageHindi, English, Marathi
ClassificationSmruti_Granth & Articles
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy