SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 181
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ बेताचेच होते. त्याची कारणे दोन आहेत. साधारण कारण तर कालविपरीतता हे आहे व दुसरे असाधारण कारण असे की बहुभाग श्रोते भयानक मिथ्यात्वाने आक्रान्त आहेत. त्यांचे ठायी जिज्ञासेचाही अभाव आहे. शिवाय जैन धर्माचे प्रवक्ते सामर्थ्यसंपन्न, सच्चारित्र, सम्यक्, श्रद्धावान असे बहुसंख्य असावयास हवेत, त्यांचा तुटवडा आहे. युक्त्यनुशासनमध्ये त्यांनी म्हटले आहे कालः कलिर्वा कलुषाशयो वा, श्रोतुः प्रवक्तुर्वचनाशयो वा । त्वच्छासनैकाधिपतित्वलक्ष्मी-प्रभुत्वशक्तेरपवादहेतुः ॥ [पं. सुमेरचन्द्र दिवाकर लिखित 'चारित्रचक्रवर्ती 'च्या आधारे. ] श्री. माणिकचंद तुळजाराम वाघोलीकर, बारामती. १. मुनीपणाचा जन्मानुजन्माचा अभ्यास पू. महाराजांशी सहज बोलणे सुरू असताना ते म्हणालेत, 'स्वाध्यायामध्ये जे गहन प्रश्न उत्पन्न होतात त्याबाबत मी रात्री सामायिक झालेवर विचार करतो. विचारांती प्रश्नाचे उत्तर व कार्यकारण भाव लक्षात येतो.' महाराज रात्रौ तीन किंवा चार तासापेक्षा जास्त झोप घेत नसत. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'मी या पर्यायात प्रथमतःच मुनी झालो नाही. सर्व सामान्यांना कठीण वाटणाऱ्या बाबींसंबंधी विकल्पच येत नाहीत. सहज प्रवृत्ती असते म्हणून विश्वासपूर्वक वाटते. पूर्वभवांत एकदोन वेळ तरी मुनिपर्याय धारण केली असावी. २. शरीराबाबत अनासक्ती व अपूर्व सहनशीलता दहिगाव येथे सन १९५२ च्या चातुर्मासात उतरताना पाय घसरून पाव इंच खोल जखम झाली. खूप रक्त गेले. पण चर्येवर किंचितही दुःख नव्हते. बाह्य उपचार होत. परंतु जखमेवर त्यांनी कपडा बांधू दिला नाही. जखम योग्यकाळी बरी झाली. 'शरीराचे काम शरीर करील, रोगाचे काम रोग करील, आमचे काम आम्ही करावे' अशा सहज प्रवृत्तीमध्ये आचार्यश्री असत. भेदविज्ञानाचा आध्यात्मिक पाठ त्यांचा जीवनमंत्र होता. सल्लेखनेच्या ३६ दिवसात एकदाही 'हुश्श !' किंवा 'अरेरे !' असे खेदप्रदर्शक शब्द मुखावाटे बाहेर पडले नाहीत. भेदविज्ञानाचा पाठ प्रत्यक्ष आचरणाने आचार्यश्रींनी दिला. ३. राव-रंकाबाबत समदृष्टी शिखरजीच्या यात्रेहून परतताना कटनी येथे चातुर्मास होता. श्री. सर सेठ हुकुमचंदजी त्यांचे दर्शनास येत असल्याचे कळाले. संघातील मंडळी टापटीपीने बसण्याचा यत्न करू लागले. पण आचार्य महाराजांचे ठायी कोणतीच चुळबुळ दिसली नाही. सेठ नमस्कार करून समोर बसले. महाराजांचे दृष्टीत सर्वत्र समभाव होता. याचाच सेठजीचे मनावर फार परिणाम झाला असे त्यांनी स्वतः वारंवार बोलून दाखविले. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.012022
Book TitleAcharya Shantisagar Janma Shatabdi Mahotsav Smruti Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
PublisherJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
Publication Year
Total Pages566
LanguageHindi, English, Marathi
ClassificationSmruti_Granth & Articles
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy