SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 162
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ स्मृनि-मंजूषा १३३ त्यावेळी निर्वस्त्र निर्वाण स्वामींमध्ये 'सिद्धप्पा स्वामी' होते. त्यांचे गाव अथणी तालुक्यात होते. त्यांचे प्रत्यक्ष दर्शन मला घडले नाही; तथापि हातात जपमाला घेऊन उभा असा फोटो पाहिलेला मला आठवतो. तसेच त्यांची ख्याती मात्र फार मोठी होती. त्यांच्या पूर्वी या भागात होऊन गेलेले म्हणजे 'विद्यासागर मुनी.' यांचे स्मरण आजही अकिवाटला दाखविले जाते. त्यावेळी मुनिपदाचे नाव न घेता त्यांच्या खुद्द नावाने किंवा गावाच्या नावाने ते प्रसिद्ध होते. अशापैकी निल्लिकार अनंतकीर्ती, गुडेबंडी स्वामी व अमीनभावी स्वामी या तिघांचे मला स्मरण आहे. अमीनभावी स्वामी ग्रंथ-लेखनाचे सदैव काम करीत असत, आणि फक्त भिक्षेच्या वेळी मात्र ते निर्वस्त्र असत. मैसूरकडून आलेले परंतु आमच्या भागात फार प्रसिद्ध पावलेले एक ऐल्लक स्वामी म्हणजे 'बिदरे पायसागर' हे होत. ते अत्यंत अभ्यासू वृत्तीचे व स्वाध्यायपरायण होते. त्यांनी आपले अखेरचे दिवस मंड्या येथे घालविले. ___म्हैसूर भागातूनच आलेले आणखी एक प्रसिद्ध निर्वाणस्वामी म्हणजे 'देवप्पा स्वामी' होत. त्यांचे मुनिपदाचे नांव 'वृषभसेन ' किंवा 'देवेन्द्रकीर्ति' असे होते. ते निर्वाण स्वामी असले तरी भिक्षेच्या वेळी तेवढेच निर्वस्त्र होत होते. बाकीच्या वेळी एकच छाटी ठेवीत असत. चिक्कोडी वगैरे तालुक्यात ते अत्यंत पूजनीय होते आणि विशेषेकरून ते याच भागात राहात असत. याच सुमारास बोरगांव येथील गुंफेमध्ये रहात असलेले निर्वाणस्वामी म्हणजे 'आदिसागर' होत. ते सदैव नग्न रहात असत. त्यांचे विहारक्षेत्र अगदीच संकुचित होते. लांब लांबचे श्रावक लोक बोरगांवला येऊन त्यांची भिक्षा करण्यात स्वतःला धन्य समजत. ते आठवड्यातून एकदाच भिक्षा करीत असत. मग ती ऋतुमानाप्रमाणे आम्ररस असेल वा उसाचा रस असेल. सातप्पा व रत्नप्पा स्वामी ____ या वातावरणात प्रादर्भूत झालेले निर्ग्रन्थ मुनी म्हणजेच 'आचार्य श्री शांतिसागर मुनी' होत. त्यांचे मातृगृह यळगुड येथे होते आणि तेथेच त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे पितृगृह भोज येथे आणि ही दोन्ही गावे जवळच आहेत. पुढे महाराज 'शांतिसागर' या नावाने प्रसिद्ध झाले तरी आमच्या भागात त्यांना 'सातगौंडा स्वामी' या नावानेच संबोधीत असत. त्यांचे समवयस्क असे भोजेतच जन्मलेले दुसरे एक निर्ग्रन्य स्वामी होते. ते 'रत्नप्पा स्वामी' या नावाने ओळखले जात. जेव्हा जेव्हा भोजच्या या दोन्ही निर्ग्रन्थ स्वामींचे नाव एकत्र घेण्याचा प्रसंग येत असे, तेव्हा तेव्हा हे दोघे - सातप्पा व रत्नपा स्वामी' असे म्हटले जात. श्री रत्नप्पा स्वामींबद्दल येथे चार शब्द नमूद करणे मला आवश्यक वाटते. ते सदैव नग्न राहात असत. त्यांची चर्याही फार कडक होती. स्वभावाने थोडे ते तापट होते, परंतु सदैव स्वाध्याय व ध्यान यात मग्न असत. त्यांचे अखेरचे दिवस कडक तपश्चर्येत गेले आणि बेडकीहाळ येथे सल्लेखना मरण त्यांना शांतीने प्राप्त झाले. या मृत्युमहोत्सवात आजूबाजूच्या जैनच नव्हे जर जैनेतर लोकांनी देखील भाग घेतला Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.012022
Book TitleAcharya Shantisagar Janma Shatabdi Mahotsav Smruti Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
PublisherJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
Publication Year
Total Pages566
LanguageHindi, English, Marathi
ClassificationSmruti_Granth & Articles
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy