SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 155
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १२६ आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ 'आम्न्याचे'-शेठ खुशालचंद. ___ 'त्याला आंबे लागलेले तर कोठे दिसत नाहीत !'- महाराज. 'आज लागलेले नसले म्हणून काय झाले ? ऋतुमानाप्रमाणे फळे येतील. उन्हाळ्यात पुन्हा लागावयाचीच आहेत. झाड आंब्याचेच ह्यात शंका नाही.'-शेठ खुशालचंद. 'आज तरी वृक्षाला फळे नसली तरी त्यास आम्रवृक्ष जसे नाकबूल करता येत नाही त्याचप्रमाणे आजचे मुनि जरी अवधिज्ञानी नसले व पूर्वीच्या चतुर्थ काळातील मुनी प्रमाणे पक्षोपवास, मासोपवास हीन संहननामुळे करू शकत नसले तरी त्यांचे मुनिपद नाकबूल करता येत नाही. संहनना प्रमाणे ज्ञान वैराग्यात तरतमता जरी राहिली तरी ती पदे नाहीतच अशी एकान्तिक मते नकोत.'---महाराज. ____ महाराजांची प्रशान्त मूर्ती, निर्विकार वृत्ती, मृदुमधुर वाणी आणि अढळ धर्मश्रद्धा पाहून उभयतांची समजत पटली. त्यांनी महाराजांचे पाय धरले. त्यांच्या अन्तःकरणाचे पाणी झाले. त्यांनी परस्पराकडे एकदा अर्थपूर्ण नजरेने पाहिले व दोघेही हात जोडून जिनदीक्षची याचना करू लागले. 'आज तुम्ही यात्रेला निघालात ती पूर्ण करून या. त्यानंतर यासंबंधी निर्णय घेऊ या.' --महाराज म्हणाले. ___ यात्रा पूर्ण झाली. समडोळी (जि. सांगली) मुक्कामी महाराजांच्या चरणसानिध्यात दोघांनीही जिनदीक्षा धारण केली. शेठ हिरालालजी म्हणजे आचार्य श्री वीरसागर महाराज व शेठ खुशालचन्दजी म्हणजे मुनि श्री चन्द्रसागरजी महाराज हे होत. आचार्य श्रींच्या संपर्कात जीवनाचे सोने असे होई. आचार्यश्रींची अपूर्व समयसूचकता आचार्य महाराज विहार करीत काशी-बनारस येथे आले. मुक्काम दि. जैन महाविद्यालय भदैनीघाट येथे होता. पूर्वीच महाराजांबद्दल औत्सुक्य पसरले होते. महाराज महान् ज्ञानी, महान् तपस्वी अशी खूप प्रसिद्धि होती आणि शालेय शिक्षण मात्र फारसे झालेले नाही. केवळ तीन चार इयत्ता हे ऐकून महाराजांच्या ज्ञानाची चाचणी घेण्याच्या विकल्पाने काही ब्राह्मण पंडित भेटावयास आले. त्यांनी प्रश्न छेडला की-आपण चामड्यतील तेल, तूप, हिंग, पाणी वगैरे पदार्थ ग्रहण करीत नाही हे खरे आहे काय ? 'होय खरे आहे ' महाराज. ' तर मग ओल्या सजीव रक्तमांसांतून झिरपून येणारे दूध, दुधापासूनचे तूप कसे काय चालते ? गाई म्हशी तर सप्तधातूच्या शरीराच्या असतात. त्यांच्या शरीरातून येणारे दूध शुद्ध कसे ?' 'वस्तुस्वभावोऽतर्कगोचरः ' हा वस्तुस्वभाव आहे. तेथे तर्क चालत नाही. गाई व म्हशीच्या एका चाऱ्यापासूनच जसे रस, रक्त, मांसादि सप्तधातु निर्माण होतात त्याचप्रमाणे दूध हा पदार्थ निर्माण होतो. ते दूध स्वभावतः शुद्ध आहे आणि मांसादि अशुद्ध आहेत. याशिवाय ते दूध प्राण्यांना काहीही दुखापत न करिता काढले जाते म्हणून ते सेव्य आहे अर्थात भक्ष्य आहे. हीच परिस्थिति वनस्पतीत आहे. ज्या वनस्पतीची पाने फुले ही अमृताप्रमाणे संजीवन देतात पण त्याचीच मुळे खाल्ली तर माणूस प्राणास मुकतो. धर्ममार्तंडांनी 'हे काही आम्हास पटत नाही' अशी नकारार्थी मान डोलावली. सभा त्यांचा कोडगेपणा Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.012022
Book TitleAcharya Shantisagar Janma Shatabdi Mahotsav Smruti Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
PublisherJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
Publication Year
Total Pages566
LanguageHindi, English, Marathi
ClassificationSmruti_Granth & Articles
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy