SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 726
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ २११ १२- ३२ मध्ये नैयायिक दर्शनाची, ३३ ते ४३ सांख्य दर्शनाची ४४ ते ५८ मध्ये जैन दर्शनाची ५६ ते ६७ वैशेषिक दर्शनाची व ६८ ते ७७ श्लोकां मध्ये जैमिनीय दर्शनाची माहिती दिली आहे । वैशेषिक दर्शनाचा खुलासा करताना, सुखातीलाच महले आहे की, देवतांच्या अपेक्षेने नैयायिक दर्शन व वैशेषिक दर्शन यांत विशेष भेद नाहीं, दोन्ही दर्शनात महेश्वराला सृष्टिकर्ता व संहारक म्हटले आहे । तत्वविषयक जो भेद आहे तो त्यांनी स्पष्ट केला आहे । बरीच दर्शने नैयायिक दर्शन व वैशेषिक दर्शन यात विशेष भेद मानीत नाहीत. दोन्ही दर्शनांना एकाच दर्शनांर्तगत मानले आहे । अशप्रकारे पूर्व उल्लेख केलेली ५ अस्तिक दर्शनात एक नास्तिक दर्शन अर्थात चार्वाक दर्शनाची वाद करून एकूण सहा संख्या पुरी केली आहे । शेवटी ८० ते ८७ श्लोकात लोकायत दर्शनाची देखील माहिती दिली आहे । येथे विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे आ० हरिभद्रसूरीनी कोणत्याही दर्शनाची टीका केली नाही । केवल कोणत्या दर्शनाची कोणती मान्यता आह याची चर्चा केती आहे । 'षट्दर्शन समुच्चय' ग्रंथावर गुणरत्नसूरि ( वि० सं० १४००-७५) रचित एक 'तर्क रहस्यदीपिका' नावाची टीका आहे । अर्थात् दर्शनाविषयक माहिती देणारा 'षट्दर्शन समुच्चय ७ हा आ० हरिभद्रचा एक महान ग्रन्थ आहे । त्यांच्या लेखन शैलीचा प्रभाव नंतरच्या अनेक विद्वानांच्यावर पडलेला दिसतो । आचार्य भट्टाकलंक व तत्वार्थराजवार्तिक आ० भट्टाकलंक है, व्या शतकातील एक प्रकांड पंडित होऊन गेले. जैन वाङमयात त्यांचे स्थान अनुपमेय असे आहे. त्यांना श्वेतांबर व दिगंबर या दोन्ही संप्रदायांची मान्यता असून, त्यांनी जैन न्यायास यथार्थ स्वरूप दिले होते, जैन न्यायास त्यांनी जे यथार्थ रूप दिले त्यावरच पुढच्या जैन ग्रंथकारांनी आपनी न्यायविषयक ग्रंथरचना केली. ते एक महान विद्वान, धुरंधर शास्त्रार्थी व उत्कष्ट विचारक होऊन गेले. त्यांची ग्रंथरचना विद्वान दार्शनिक पंडितांना देखील समजण्यास कठीण अशी आहे. त्यांना जैन न्यायाचे 'सर्जन' असे म्हटले आहे. त्यांच्चा नावावरूनच जैन न्यायास श्लेषात्मकरित्या 'अकलंक न्याय' असे म्हटले आहे. स्वामी समतभद्र व पुज्यपाद यांच्यानंतर त्यांनीच जैन वाङमय समृद्ध बनविलेले दिसते आणि म्हणनच भट्टाकलक यांचे नाव ऐकताच जैन धीमयांचे मस्तक श्रद्धेने नत होते । बौद्ध धर्माचा प्रसार अति जोरात चालला असता व इतर सर्व दर्शनांच्या प्रसाराला आला बसत चालला असतानाच, आ० भट्टाकलंकाचा जन्म झाला बौद्ध दार्शनिकांच्या बरोबर त्यांनी बऱ्याच वेला चर्चा करुन शेवटी अनेकांत विजय ची पताका फडकविलेली दिसते याविषयीची माहिती आपणाला कथाकोश ग्रंथात व राजवलीकथेनुसार मिलते एवढेच नव्हेतर, त्यांच्या विद्वत्तची प्रशंसा अनेक शिलालेखातून व विविध ग्रंथकारांच्या ग्रंथातून मिलते । आ० भट्टाकलंकांच्या जीवनाविषयीची निश्चित माहिती आपणाला मिलू शकत नाही जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीनुसार ते 'लघुहब्व' राजाचे पुत्र असून, आजन्म ब्रह्मचारी असलेला दिसतात त्यांच्या एका भावाचे नाव निकलंक असल्याचे सांगितले आहे. ज्ञानप्राप्तीसाठी अकलक व निकलंक या Jain Education International श्री आनन्द जन् श्री आनन्द For Private & Personal Use Only फ्र ग्रन्थ www.jainelibrary.org
SR No.012013
Book TitleAnandrushi Abhinandan Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorVijaymuni Shastri, Devendramuni
PublisherMaharashtra Sthanakwasi Jain Sangh Puna
Publication Year1975
Total Pages824
LanguageHindi, English
ClassificationSmruti_Granth & Articles
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy