SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 99
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ एकादश गणवर व क्षात्र शिष्यगण. चांत खेळत असतो तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन एका विद्याधराने तिला विमानांतून नेली. पण पुढे विद्याधरीच्या भयामुळे त्यानें चंदनेला वाटेंतच जंग: लांत सोडून दिली. तेथे एका भिल्लानें तिला घेऊन कौशांबी नगरीतील शेठ वृषभसेनाला विकून टाकली. शेठाणी सुभद्रेला तिचें रूपलावण्य पाहून असूया उत्पन्न झाली व तिनें तिला तळघरांत कोंडून ठेविली. पण चंदनबालेच्या पुण्योदयामुळे महावीरस्वामी सहा महिन्यांच्या उपवासाचे पारणे करण्यासाठी कौशां बीला आले असतां आपल्या अभिग्रहानुसार त्यांनी चंदनबालेकडून आहार घेतला. त्यामुळे तिचे नांव गांवभर झालें. तिला राजवाड्यांत नेण्यांत आलें. चेटकाची एक मुलगी कौशांबीच्या राजाला दिली होती. तिनें आपल्या लघुभगिनीला तात्काळ ओळखले. मृगावती राणीजवळ कांहीं दिवस राहून नंतर चंदनवाले आर्थिकेची दीक्षा घेतली व तो महावीर तीर्थकरांच्या समवसरणांत येऊन दाखल झाली. राजपुरीनगरीत सत्येश्वर नांवाचा राजा राज्य करीत होता. तो इतका विषयासक्त होता की सर्व राज्यकारभार काष्टांगार मंत्र्यावर सोपवून तो विजया राणीशी नेहमी रममाण होत असे. राणीला एक दुष्ट स्वप्न पडलें. त्यावरून आपला खून होणार असे तिला कळून आले. तेव्हां सत्यंवर राजानें एक विमान तयार करून तें राणीला चालविण्यास शिकविले जेर्णेकरून आपति आली असतां आकाशांत उडून जाता येईल. काष्टांगाराला पुढें दुष्टबुद्धि सुचली व राजाला मारून आपणच राज्योपभोग भोगण्याचे त्याने ठरविलें. म्हणून सर्व सैन्य त्यानें सत्यंवर राजाविरुद्ध पाठविलें. सत्यंधराने विजयाराणीला विमानांत बसवून पाठवून दिली व आपण लढता लढतां मरून गेला. तें विमान स्मशानांत येऊन उतरलें. तेथे गंधोत्कटशेट आपल्या पुत्राची उत्तरक्रिया करण्यास आला होता. विमानांत विजयाराणी प्रसूत झाली होती. तिनें तो पुत्र स्मशनांत ठेवला व फिरून विमानांतून उडून गेली व पुढे तपस्त्र्यांच्या आश्रमांत राहिली. इकडे स्मशानांत पडलेलें तान्हें मूल पाहून गंधोत्कट रोटने नेऊन ते आपल्या पत्नीस दिले. तिनें त्या तान्हुल्याला पुत्रवत् प्रेमाने वाढविले. त्याचे नांव जीवंधर ठेवण्यांत आलें होतें. आपल्या बाललीलांनीं जीवंधरानें शेठ व शेठणीला पुष्कळसें रमविलें. पुढें युवावस्था प्राप्त झाल्यानंतर पुष्कळ विद्याध्ययनहि केलें. गांधार देशाची राजकन्या गंधर्वदत्ता इच्याशीं जीवंधरावें लग्नहि झालें. जीवंधर (८७)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy