SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 94
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र पावलेली असतात. त्याची चित्तवृत्ति स्फटीक मण्याच्या पात्रांतील पाण्याप्रमाणे अत्यंत निर्मळ व स्थिर असते. तेरावें सयोगकेवली गुणस्थान होय. काययोगाशिवाय इतर सर्व योग नाहीसे झाल्यामुळे नवा कर्मबंध नसतो व प्रारब्धकर्माचाहि समूळ नाश झालेला असतो. ही स्थिति जीवनमुक्ताची होय. चौदावें गुणस्थान अयोगकेवली होय. हे गुणस्थान प्राप्त झाले की, पांच निमिपांतच काययोगहि नाहीसा होऊन मोक्षप्राप्ति होते. चौदा गुणस्थाने ओलांडून गेलेला (जीव ) तीन लोकांच्या अग्रभागी सिद्धशीला म्हणून स्थान आहे तेथे जातो व फिरून परत येत नाही. या सिध्दात्म्यास सम्मक्त्व, अनंतज्ञान, अनंतदर्शन, अनंतवार्य, सूक्ष्मत्व, अवगाहनत्व, अगुरुलघुत्व व अव्याबाधत्व असे हे आठ गुण प्राप्त होतात. याप्रमाणे क्रमाक्रमाने चौदा गुणस्थानांवरून आत्मा उध्वगमन करतो. जिनशासनाच्या न्यायपद्धतीला स्याद्वाद म्हणतात. या पद्धतीमुळे कोणत्याहि वस्तूचे योग्य स्वरूप अविच्छन्नपणे, स्पष्टपणे व अबाधितपणे दिसून येते. या पद्धतीने केलेली व्याख्या घोटाळा उत्पन्न करीत नाहीं; कारण या पद्धतीमध्ये प्रत्येक वस्तूचा विचार सर्व दृष्टीनें-स्वकीय व परकीय-केला जातो. बाराव्या शतकाचे शेवटी झालेले हेमचंद्रमरी यांनी आपल्या अन्ययोगव्यवच्छेदिकेत म्हटले आहे की, 'हे भगवन् , पर्यायापेक्षेने विचार न करता केवळ एखाद्या वस्तूचा समग्रपणे विचार करू लागलो तर ती वस्तूच मृल द्रव्य आहे असे वाटते. अन्वयापेक्षेने विचार करावयाचे सोडून एखाद्या पर्यायाचाच विचार करूं लागल्यासहि तो पर्याय मूल द्रव्य होय असे वाटते; परंतु सकल व विकल या अपेक्षाभेदाने सात तन्हेने विचार करण्याची विद्वन्मान्ध पद्धत हे प्रभो, तूंच मात्र दाखवून दिली आहेस.' प्रत्येक द्रव्य अनंतधर्मसमुदायात्मक असल्यामुळे ते अमुक एकाच प्रकारचे आहे असे म्हणणे अयुक्तिक होय. त्या द्रव्याच्या अनेक प्रकारांपैकी हा एक प्रकार आहे इतकेच म्हणता येईल. ही गोष्ट दाखविण्याकरितांच ' स्यात् ' या शब्दाची योजना आहे. स्यात् म्हणजे कथंचित किंवा एका दृष्टीने हा स्याद्वाद सात वाक्यांनी केला जातो म्हणून त्यास सप्तमगीनय असेहि म्हणतात. 'एकत्रवस्तुनि एकैक धर्मपर्यनुयोगवशात् अविरोधेन व्यस्तयोः समस्तयोश्चविधिनिषेधयोः कल्पनयास्यात्का. रांकितः सप्तवा वाक्प्रयोगः सप्तभंगी'. एखाद्या वस्तूबद्दल परस्परविरोध न (७८)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy