SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 89
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र airat द्वारेहि बंद झाली. तेव्हां महावीरस्वामींना केवलज्ञानाची प्राप्ति झाली. एकदां ते ऋजुकलानदीचे कांठीं सालवृक्षाखालील शीलेवर बसले असतां वैशाख शु० | १० स अपरान्हकाली प्रभूच्या घातिकर्माचा नाश होऊन त्यांना केवल - ज्ञान प्राप्त झाले. लगेच इंद्रादि देवांनी येऊन यथास्थित लोकालोकाला एकसमयावच्छेदेंकरून प्रकाशित करणा-या, इंद्रियांची अपेक्षा नसलेल्या, तीर्थंकराच्या दहा विशेष गुणांसहित असलेल्या महावीरप्रभूंना वंदन केलें व समवशरणाची रचना करून दिली. प्रत्येक तीर्थकराचे जसे दिव्य शरीर बनते तसे महावीरप्रभूचेंहि बनले. त्यांचें मान संपले व जिनवाणी वूं लागली. त्यांना अनंतज्ञान, अनंतदर्शन, क्षायिक सम्यक्त, क्षायिक चारित्र, अनंतदान, अनंतलाभ, अनंतभोग, अनंत उपभोग व अनंत वीर्य अशा नऊ लब्धि प्राप्त झाल्या. प्राकार, चैत्यवृक्ष, ध्वजा, वनदेवी, स्तूप, स्तंभ, तोरणसहित मानस्तंभ या वस्तु समवसरणांत असतात व ते तीर्थंकरदेहाच्या बारापट उंच असतें. महावीरप्रभु केवलज्ञानी झाल्यामुळे त्यांच्या ज्ञाननेत्राला सर्व लोकालोकांतील चराचर वस्तु दिसूं लागल्या. ते सर्वज्ञ झाले; त्रिलोकवंदनीय बनले. ज्ञानावरणादि चार घातीकर्माचा क्षय झाल्यामुळे ते सयोगकेवली झाले. त्यांची ज्ञानधारा एक क्षणहि मंद होणे यापुढे शक्य नव्हते. ही अवस्था प्राप्त करून घेतल्यानंतरचेंच जीवन खरोखर सुखानंदकारी होय. तें दिव्य होय; परमोत्कृष्ट होय. जेव्हां प्रभूंना केवलज्ञानप्राप्ति झाली 'तेव्हां लोकालोकांत अलौकिक घटना घडूं लागल्या. आसमंतातील दुर्भिक्ष दूर झाले. भव्यजीवांची वृद्धि झाली. डॉ. विमलचरण लॉ. एम्. ए यांनी या बाबतीत असं लिहिलें आहे की, ' भगवान महावीर सर्वज्ञ, सर्वदर्शी व अनंत केवलज्ञानी म्हणजे सर्वकाळी, सर्व अवस्थांमध्ये व सर्व वस्तूंचे ज्ञान असणारे होते. कोणाची वृत्ति कशी आहे हें ते बरोबर जाणत होते. ते परमविद्धान् होते व शिष्यांचे पूर्वभव सांगत असत. ' केवलज्ञानाची व्याख्या याहून अधिक करणें शक्यहि नाहीं. कारण तीहि इंद्रियगोचर स्थिति नाहीं. इंद्रियांच्या अपेक्षेवांचून होणारे ज्ञान तें केवलज्ञान. मग त्या अवस्थेचें वर्णन इंद्रियें काय करणार : अनंतज्ञान झालेल्या सर्वज्ञांना सृष्टीचें कोडे सुटलेलें असतें. त्यांना अनंतमुख व अनंतवीर्यहि असतें. त्यांच्या भाग्याला काय उणें ! महावीरप्रभूंनी खडतर तपश्चर्येनंतर अशी स्थिति प्राप्त करून घेतली कीं, जीमुळे संसारांत पुन्हां येणें त्यांना जरूर राहिलें नाहीं. आत्म्यावीजी स्वाभाविक परमोच्च स्थिति ती त्यांना प्राप्त झाली. आतां ते कृत्रिमता ( ७० )
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy