SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 86
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ दीक्षाग्रहण व केवलज्ञानप्राप्ती नाही काय?' महावीरस्वामींच्या या उत्तरावर त्रिशलादेवी काही बोलू शकली नाही; पण तिचा पुत्रमोह काही दूर झाला नव्हता. श्वेताम्बर ग्रंथांतून तर म्हटले आहे की, आईच्याखातर आणखी दान वर्षे दीक्षा घेण्याचे महावीरस्वामींनी पुढे ढकलले. पण नंतर तरी मन घट्ट करून त्रिशलादेवीला दीक्षेची अनुज्ञा महाचीरस्वामींना द्यावीच लागली. आप्तेष्टमित्रांचा निरोप घेऊन, सर्वस्वाचा त्याग करून कुंडग्राम सोडून महावीरस्वामी निघाले. नंतर देवांनी आणलेल्या रत्नखचित पालखीमध्ये प्रभु विराजमान झाले व नागखंडवनांत जाऊन उतरले. तेथे उत्तरेकडे तोंड करून एका स्फटिकशीलेवर बसले. अनंतसिद्धांना नमस्कार करून त्यांनी अंगावरील वस्त्रालंकार काढ़न दान केले. मार्गशीर्ष कृष्ण १० ला वानी परमकल्याणकारी निग्रंथदीक्षा धारण केली. पांच मुठी केशलोच केला. इंद्राने प्रभूचे केस रत्नपालांत घेऊन क्षीरसमुद्रांत नेऊन टाकले. सर्व देवांसमवेत इंद्रानें प्रभूच दीक्षाकल्याणक केले व ते सर्व देवलोकी परत गेले. महावीरकाली नग्नावस्था ही साधला आवश्यक मानली जात होती व तें यथायोग्यच आहे. नन्न होण्यापूर्वी कामेच्छा तर पूर्णपणे जिंकावी लागतेच, पण याशिवाय देहावरील ममताहि सोडावी लागते व लज्जेचा आणि मानापमानाचा भाग करावा लागतो. म्हणून नग्नावस्था ही साधची एक मोठी कसोटीच आहे यांत शंका नाही. दिगम्बर जैनशास्त्राप्रमाणे श्वेताम्बर व इतर हिंदुशास्त्रांनाहि नग्नावस्था ( दिगम्बरावस्था ) श्रेष्ठ असल्याचे मान्य आहेच; पण ती इतर धर्मशास्त्रांनाहि मान्य आहे. बायबलमध्ये सॅम्युयल १९-२४ मध्ये म्हटले आहे, 'ज्याने आपली वस्त्र फेंकून दिली व दिवसभर तो नम राहिला व नंतर त्याने विचारले की काय ? हा आत्मा पैगम्बरापींच आहे ? '' इसाया २०-२ मध्ये म्हटले आहे, 'प्रभून अमोजचा पुत्र इसा याला म्हटले, पादत्राण व वस्त्रे काढून ठेऊन ये. तसे त्याने केलें व नग्नपणे विचरूं लागला.' महंमदापूर्वी काबाची प्रदक्षिणा स्त्रीपुरुषांना नन्न होऊन करावी लागत असे; तेव्हां अरबांनाहि नमावस्थेचे महत्त्व माहीत होते असे दिसते. स्वर्गाचे राज्य बालकांचे आहे असे बायबलात म्हटले आहे. ज्याला परमार्थ साधावयाचा आहे त्याने बालकाप्रमा च निर्विकार, निर्मोह, निर्लज्ज व निरामय बनले पाहिजे हे स्पष्ट आहे. बौद्धग्रंथातही दिगम्बरत्वाची स्तुतीच केलेली आहे. दिगंबर होणं मूल, मूर्ख व साधु या तिघांशिवाय कोणालाहि शक्य नाही. मनुष्यमात्राला जोपर्यंत विकार आहेत
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy