SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 84
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र धरले होते. माहेंद्र व सनत्कुमारांनी चवन्य धरल्या होत्या; चामर, स्फटिकमण्याचा दर्पण, पंखा, कलश, कल्पवृक्ष, पुष्पांच्या माळा व इतर अष्टमंगलद्रव्ये इंद्राण्यांनी घेतली होती. सर्व देव मनोवेगानेच मेरूपर्वतावर जेथें अकृत्रिम जिनालये आहेत . तेथे येऊन पोहोचले. या पांडुकवनांत शंभर योजनें लांब व पन्नास योजनें रुंद आणि आठ योजनें उंच अशा चंद्रप्रकाशाप्रमाणे शुभ्र असलेल्या पांडुक शीलेवर सर्व देव आले. चंद्रकलेच्या आकाराच्या त्या पांडुकीलेवर पांचशे धनुष्य व्यासाचे, अडीचशे धनुष्य उर्चाचे व त्याच्या दुप्पट लांबीचे असें एक सिंहासन ठेऊन त्यावर जिनबालकाला ठेवण्यात आले. सर्व देवांनी जिनमहिमा गाण्यास सुरवात केली. तेजस्वी महारत्नखचित घागरीत क्षीरसमुद्राचे पाणी भरून आणून इंद्रादि देवांनी शंख, नौबत वगैरे मंगलवाद्यांच्या निनादांत जिनबालकाला अभिषेक केला. त्यावळी मेरुपर्वतहि गदगद हालला; कारण जिनेश्वर अनंत बलशाली असतात. त्याच वेळी इंद्रादि देवांनीच जिनबालकाचें वीर असें नांव ठेविलें. अभिषेकानंतर अप्सरा नृत्य करूं लागल्या. जिनबालकाला रत्नमय अलंकारांनी व मनोहर वस्त्रांनी भूषित केले, मंगल द्रव्ये अर्पण करण्यांत आली व इंद्रादिदेवांनी खालील प्रमाणे स्तुति केली. 'हे वीर नाथा : जर तुझी अबाधित जिनवाणी नसती तर भव्यजीवांना या भूतलावर वस्तूचे खरे स्वरूप कसे समजले असते ? सूर्यप्रकाशावांचून कमलें जशी विकसत नाहीत त्याचप्रमाणे जिनेश्वराच्या आगमानाशिवाय भव्यजीवहि प्रफुल्लित होत नाहीत. हे जिनेशा, तेलवातीशिवायचे आपण दीप. आहांत; काठिण्यविरहित चिंतामणि आहांत; सर्परहित चंदनवृक्ष आहांत; उष्णतारहित सूर्य आहांत. क्षीरसमुद्रावरील फेनाप्रमाणे आपले यश धवल आहे.' याप्रमाणे स्तुति करून व मंगलारति पूर्ण करून सर्व देव जिनबालकाला घेऊन कुहग्रामातील सिद्धार्थ राजाच्या प्रासादांत आले. इकडे कुंडग्रामांतहि प्रभु जन्मल्याची वार्ता हत्तीवरून साखर वाटीत लोकांना विदित करण्यांत आली असल्यामुळे भेटी घेऊन पुरवासी नरनारी व बालके सिद्धार्थाच्या वान्यांत जमली होती. देवांनी प्रथम दिव्यवस्त्रे, अलंकार, पुष्पहार व उटीचे पदार्थ वगरेनी सिद्धार्थराजा व राणी त्रिशला यांचे पूजन केलें, भेटी अर्पण केल्या व नृत्यगायन करून जिनस्तुति करीत करीतच इंद्रादिदव देव. " लोकाला परत गेले. पुरवासी जनांच्या भेटी सिद्धार्थाने घेतल्या व यथोचित दानहि केले. वैशालीनगरीस व इतरत्र वीरजन्माची वार्ता कळविण्यांत आली. (६२)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy