SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 81
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ वीर जन्मकल्याणक त्रैलोक्यसुंदर माल निका, पुष्पभरानें लवलेल्या वनमालेप्रमाणे सुंदर नवमालिका दिक्कन्या विशिरा; उमललेल्या फुलाप्रमाणें जिचें हास्यवदन आहे व कल्पवृक्षाचीं फुलें जिने धारण केली आहेत अशी पुष्पचूला, चित्रविचित्र बाहुभूषणांनी युक्त अशीकनक चित्रा; स्वनेजानें सुवर्णकांतीसहि लाजविणारी कनकादेवी व अप्रतिम सुंदर अशी वारूणी देवी अशा या आठ दिक्कन्यका हात जोडून विनम्र मस्तकानें विशला राणीकडे गेल्या. स्वाभाविक सुंदर आकृतीच्या या अष्ट दिक्कन्यकानी परिवेष्टित अशी त्रिशलाराणी अधिकच शोभू लागली. बरोबरच आहे. चंद्रिका एकाकीं असली तरी जननयनांना आनंदविते; मग ती तारांगणानें वेष्टित असल्यावर त्या शोभेचे काय वर्णन करावें ? कुबेराच्या आज्ञेनुसार तियेग्विजभक देवानी पंजरा महिनेपर्यंत ज्यांचे किरण चोहोकड पसरलेले राहतील अशा साडेतीन कोटी रत्नांची दृष्टि केली. अमृतवत् शुभ्रमहालांत मऊ कापसाच्या बिछान्यावर त्रिशलादेवी पहुडली असतां, जिनेश्वराच्या जन्माची सूचना देणारी व भव्यांनी गायिलेली सोळा स्वने तिने पाहिली. मस्तच्या मदरसानें ज्याचें गंडस्थळ ओलें झाले आहे असा ऐरावत, चंद्रप्रकाशाप्रमाणें शुभ्र व डरकाळी फोडणारा वृषभ, मोठ्या आयाळाचा व भयंकर पिंगाक्ष सिंह, रानहत्तीकडून अभिषिक्त अशी लक्ष्मी, आकाशांत लोंबत असलेल्या संगतिमय दोन पुष्पमाला, घनांधकारनिवारक पूर्ण चंद्र, कमळ विकासी बालसूर्य, स्वच्छ पाण्यांत मनसोक्त क्रीडा करणारे मत्स्ययुगल, फलाच्छादित व कमलपुष्पवेष्टित कलशद्वय, स्फटिकाप्रमाणे पाणी असलेलें कमलसरोवर, आपल्या तरंगानी सर्व दिशा व्यापून टाकणारा समुद्र, रत्नमणिकिरणांनी सुशोभित सिंहासन, फडफडणारी पताका असलेले देवविमान, नागकन्याकांनी गजबजलेलं नागभवन, आकाशभर पसरलेला रत्नपुंज व धूमरहित वन्हि हे सोळा विषय त्रिशल राणीने स्वप्नांत पाहिले. ज्या रात्री पुष्पोत्तरविमानांतून देव व्यवून त्रिशलाराणीच्या गर्भाशयांत प्रवेश करता झाला त्या रात्रीं प्रातःकालाचे थोडें पूर्वी वरील स्वप्नं तिला दिसली. प्रातःकाळी उठल्यानंतर आश्चर्यचकित होऊन तिने ती सर्व स्वप्ने सिद्धार्थराजाला सांगितली. राजालाहि ती ऐकून आनंद झाला, व त्यानें स्वप्नफल सांगण्यास सुरवात केली ती खालीलप्रमाणे, “ राज्ञे, स्वप्नांत ऐरावत पाहिला असल्यामुळे तुला त्रैलोक्याचा अधिपति असा मुलगा होईल. वृषभ पाहिला असल्यामुळे मुलगा धर्मप्रवर्तक होईल. सिंहदर्शनामुळे तो सिंहाप्रमाणे पराक्रमी होईल. लक्ष्मीदर्शनामुळे मेरू ( ५९ )
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy