SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 78
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र आहे. ते म्हणजे इ. स. पू. ४६८ या वीनिर्वाणवर्षाचे. पण या मतानुसार म. बुद्धाच्या निर्वाणानंतर महावीरस्वामी मोक्षाला गेले असें ठरतें व तें जैन भाणि बौद्धशास्त्रांना अगदीच सोडून आहे. अर्थात् हे मत सर्वस्वी त्याज्यच होय. इ. स. पू. ६०६ हे वर्ष टरविणारे मत पं. नाथुराम प्रेमी यांनी मांडले आहे. त्यांनी देवसेनाचार्य व अमितगत्याचार्य यांचे आधार दिले आहेत. त्यांत विक्रमाच्या मरणवर्षापासून वी. संवत् सुरू झाल्याचे धरले आहे. आतां शास्त्रग्रंथांतुन जे आधार वर दिले आहेत त्यावरून वीरनिर्वाणवर्ष इ. स. पू. ५४५ ठरतें व सिंहली बौद्धांनी बुद्ध परिनिर्वाणाचे वर्ष इ. स. पू. ५४३ निश्चितपणे ठरविले असल्यामुळे आणि डॉ. हॉनलेसाहेबांचे मतच कसे ग्राह्य आहे ते बाबू कामता प्रसादांच्या वर दिलेल्या उताऱ्यांत स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे या दोन्ही मतांशी इ. स. पू. ५४५ हेच निर्वाणवर्ष बरोबर जुळते. कारण या वर्षाप्रमाणे म. बुद्ध भगवान महावीरापूर्वी सहा वर्षे जन्मले व म. बुद्ध वीरनिर्वाणानंतर दोन वर्षांनी निर्वाणाला गेले असे ठरते. हा काळ इतिहासाला व योग्य प्रमाणाला धरून आहे पण रूढ कल्पनेनुसार म. बुद्ध अगोदर निर्वाणाला गेले व नंतर सोळा वर्षांनी महावीरस्वामी मोक्षाला गेले असे ठरतें व ही गोष्ट बौद्धग्रंथांर्ताल वर्णनांना सोडून आहे. बुद्ध निर्वाणाचे वर्ष इ. स पू. ४८० हि काही विद्वानांनी ठरविले आहे. पण खण्डशिरा येथील खारवेळच्या शिलालेखाशी हे वर्ष जुळत नाही. सिंहलीबौद्धांच्या मतांशी खारवेलचा शिलालेखहि जुळतो म्हणून तेंच मत अधिक विश्वसनीय होय व दोन्ही थोर पुरुषांच्या चरित्रांतील संबंधांशी डॉ. हॉनले यांच्या विचारसरणीनुसार तें मत जुळत असल्यामुळे ऐतिहासिक दृष्टया वीरनिर्वाणवर्ष इ. स. पू. ५४५ च अधिक ग्राह्य होय. पण रूढ कल्पना कशी बदलावी ? वरील नव मतास हिंदी विश्वकोषांतील आणखी एक आधार आहे तो असा तीर्थोद्धार प्रकीर्ण व तत्थुिगलियपयन या दोन प्राचीन जैन ग्रंथांनुसार ज्या गी महावीरस्वामी मोक्षाला गेले त्याच रात्री पालक राजाला अवंतीनगर्राच्या सिंहासनावर राज्याभिषेक झाला होता. पालकवंशान साठ वर्षे राज्य केले. नंतर नंदवंशाने १५५ वर्षे, मौर्यवंशाने १०८ वर्षे, नंतर पुष्पमित्र राजाने ३० वर्षे, पुढे बलमित्र किंवा भानुमित्राने ६० वर्षे, नंतर नरसेन बबरवाहनाने ४० वर्षे, पुढे गर्द भिल्लाने १३ वर्षे राज्य केल्यावर चार वर्षे शकराजाने राज्य केले. म्हणजे (५६)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy