SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 66
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र बरहि यज्ञ. याप्रमाणे उठता बसतां यज्ञ होऊ लागल्यामुळे पुरोहितवर्गाचं प्रस्थ फार माजले होते. या ब्राह्मणपुरोहितवर्गाच्या हाती सर्व समाजाच्या नाच्या यशाच्या निमित्ताने आल्यामुळे तो वर्ग समाजास डोईजड होऊन बसला. ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही कार्यातून त्यांची मध्यस्थी समाजास जाचक होऊ लागली. याचा प्रतिकार करण्याच सामर्थ्य क्षत्रियवर्गातच होते व त्याप्रमाणे ते त्या वर्गानें केलें. गौतमवुद्धाला ही ब्राह्मणांची लुडबुड नको होती. ती ऐहिक बाबतीत नको होती म्हणून मूक प्राण्यांच्या हिंसेच्या सबबीवर यज्ञसंस्थाच त्याने बंद पाडली व या कार्याला पायाभूत असलेल्या स्वर्गनरकाच्या व इंद्रादि देवतांच्या कल्पनेलाच त्याने उडवून दिले. आत्मोन्नतीस ब्राह्मण पुरोहितांच्या मध्यस्थीची जरूर नसून कोणालाहि भिक्षु होऊन किंवा दीक्षा घेऊन तपश्चर्या करता येते असें बुद्ध व महावीरांनी उपदेशन ब्राह्मगांचे मिथ्यात्व व पाखंड हाणून पाडले. नियतिवादी अनाचारी पंथ व हिंसात्मक यज्ञमार्गी वैदिक यांच्याशिवाय व्यर्थ कायशोषण करणारा एक हटयोग्यांत्राहि पंथ त्यावेळी बळावला होता. यालाहि रत्नत्रयमय सम्यधर्माचा व मध्यस्थीवर्गाचा प्रचार करून महावीर व बुद्धांनी आळा घातला. तत्कालीन समाजांत उच्चनीचत्वाचे बंड फारसे नव्हते व आहाराविहारास जन्मजाति फारशा आडव्या येत नसत. ब्राह्मगकुलापेक्षांक्षत्रिय व वैश्यकुळाला अधिक मान होता. ब्राह्मणाचा व्यवसाय पोरोहित्याचा ब्राह्मण म्हणजे भूदेव किंवा ब्रह्मज्ञानी ही कल्पना त्यावेळी नव्हती.ब्राह्मण व वैश्यांच्या मुली क्षत्रिय करीत असत. त्यावेळी हल्लींप्रमाणं जातवार धर्म नव्हते. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन्ही वर्णाच्या लोकांचे परम्पराशी रोटीबेटीव्यवहार होत होते. वर्णभेद होण्याला कारण असा मनुष्याच्या शरीरांत वर्ण आकृतीचा बिलकूल भेद नव्हता. म्हणून ब्राह्मणादींचा शूद्रादिकांबरोबर गर्भाधानविधि होत असे. जीवन्धर कुमार जातीने क्षत्रियपुत्र होते पण विद्याधर गरुडवेगाची कन्या गन्धर्वदत्ता इच्याशी त्यांचा गांधर्व विवाह झाला होता. प्रीतिकर या वैश्यपुत्राला राजा जयसेनाने आपली मुलगी पृथ्वीसुंदरी दिली होती. याशिवाय अनेक राजांची लग्ने परस्पर भिन्न जातीत झालेली आहेत. यावरून महावीरकाली जातीभेद कोणत्याच प्रकारचा पाळला जात नव्हता असे दिसते. इतिहास हा बहुतेक राजांचा किंवा मोठ्या विभूतींचाच लिहिला जातो; प्रत्येक व्यक्तीचा लिहिला जात नाही आणि यावरूनच तत्कालीन परिस्थितीचे दिग्दर्शन करावयाचे असते. (४०)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy