SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 64
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र तीच महावीरसमकालीन स्थिति होय. त्यांच्या उपदेशांच्या परिणामामुळे निर्माण झालेली परिस्थिति वीरोत्तरकालीन परिस्थिति होय. __ पार्श्वनाथतीर्थकरांच्या उपदेशामुळे अनेक भव्यजीव मुक्तीला गेले असतील व काही अंशी धार्मिक प्रगति म्हणजे जैनधर्माची प्रभावना झाली असेल, पण मिथ्यात्वाचा जोर काही कमी झाला नहता. उलट पार्श्वनाथस्वामींच्या निर्वाणानंतर मिथ्यात्वी मते अधिकच वाढली असे दिसून येते व त्या सर्वांचा जोर महावीरस्वामींच्या वेळी होता. त्यावेळी मोठमोठे चौयांशी पंथ प्रचलित होते, असें जैन ग्रंथांतून म्हटलेले आहे. त्यांपैकी प्रमुख पंथ व त्यांचे प्रवर्तक खालीलप्रमाणे होते. पहिला पंथ पूर्णकाश्यपाचा. त्या काली दिगम्बरत्व हे साधूला आवश्यक मानले जात असे. पूर्णकाश्यप नग्नपणे विवरत असे व स्वतःला तीर्थकर म्हणवून घेत असे. जे काही कर्म घडते ते आत्मा करीत नसून आपोआप घडते असा त्याचा सिद्धांत होता. त्याकाळी नियतिवाद्यांचा जो एक जबरदस्त पंथ होता व ज्याचे रूपांतर पुढे वैष्णवशैवादि ईश्वरेच्छावादी लोकांत झाले त्यापैकीच पूरण काश्यप एक होता असे म्हणावयास हरकत नाही. दुसरा पंथ प्रवर्तक मक्खलि गोशाल. हे पूर्वी पार्श्वनाथस्वामींच्या संघांतील होते. पुढे दिगम्बरमुर्नाचे चारित्र पाळणे अशक्य झाल्यामुळे ते आजीवकपंथाचे झाले. Ignorance is bliss अज्ञानांतच मुख आहे असे एक वचन आहे व ते एका अर्थी खरे आहे. मोक्षालाहि अज्ञानच साधन आहे असें गोशालाचे मत होते. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी मुळीच साधना न करतां अगदी अज्ञान स्थितीतच राहणे उत्तम, असा त्याचा उपदेश होता. तिसरे मोठे पंथप्रवर्तक संजय वैरत्थी किंवा मौद्गलायन हे होत. हेहि पार्श्वनाथस्वामींच्या शिष्यपरंपरेपैकीच होत. स्याद्वाद. मताचा विपर्यास करून हे उपदेश देत असत. चौथे मतप्रवर्तक अजितकेश कंबली होत. यांना पुनर्जन्म मुळींच मान्य नव्हता. चार महाभूनापासून हे जग व आत्मादि निर्माण झाले अशा मताचा ते प्रसार करीत. हे जवळजवळ चावाक मतच होते. पांचवे मतप्रवर्तक पकुडकात्यायन होत. जे आहे त्याचा कधीहि नाश होत नाही व असत्तेमधून कशाची उत्पत्तीहि होत नाही असा त्यांचा अभिप्राय होता. पृथ्वी, आप, तेज, वायु, सुख, दुःख व आत्मा ही सात तत्वे व प्रमुख जगांतील सर्व घडामोड त्यांच्यामुळेच होते; सुखतत्वामुळेच संयोग व दुःखतत्वामुळे वियोग होतो वगैरे प्रकारचे त्यांचे मत होते. या मतप्रवर्तकांच्या विचार (३८)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy