SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 59
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीर पूर्वकाल महावीर पूर्वकाली परशुराम, राम, कृष्ण व शिवभक्तीला ऊत आला होता; हिंसात्मक यज्ञांनाहि पार नव्हता व चातुर्वण्यांतील रहस्य जाऊन असमता व उच्चनीच भेद मातले होते. या सर्व मिथ्यात्वांचे निर्दळण करणे हेच महावीर तीर्थकरांचे काम होते. असो. आता महावीर तीर्थकर झालेल्या भव्यजीवाच्या पूर्वभवांचे दिग्दर्शन करून हे प्रकरण संपवं. प्रत्येक जीवाला जन्ममरणाच्या अनंत फे-यांतून जावे लागते व कर्माची फळे भोगून त्यांचा क्षय झाल्यानंतरच त्याला मुक्ति मिळते. या नियमांतून इतर जीवांप्रमाणे तीर्थकरांचा जीवहि सुटलेला नाही. तीर्थंकरांच्या जीवालाहि अनेक जन्म धारण करून कर्माचा उच्छेद करावा लागतो; त्याप्रमाणे महावीर तीर्थकरांच्या नावालाहि अनेक जन्ममरणांच्या फेऱ्यांतून जावे लागले. या पूर्वभवांतूनच त्यांनी षोडशभावनांचे चितवन केले व तीर्थकरपदवीचें नामगोत्रकर्म बांधलें. महावीर तीर्थकरांच्या जीवाने पूर्वी अनेक जन्म धारण केले असतील, पण जैनशास्त्रांतून त्या जीवाच्या पहिल्या मनुष्य भवापासूनचेच वर्णन आहे. मधुवनांत महावीरस्वामीचा जीव पुरुरवा नांवाचा भिन्न होता. भिल्लाच्या राहणीनुसारच पुरुरवाची राहणी रानटी होती. पण त्याच्या शुभकर्मोदयामुळे सागरसेन नांवाचे दिगंबर मुनि विहारांत असतांना त्याला मधुवनांत भेटले व त्यांनी त्याला धर्मलाभ दिला. अहिंसेचे अणुव्रत त्यांनी त्याला दिले व अशा लोकांच्या स्वभावानुसार त्याने तें एकनिष्ठेने पाळले. त्यामुळे तो मेल्यानंतर सौधर्म स्वर्गात देव झाला. कर्मानुसार तेथील फलभोग संपल्यावर तो जीव भरतचक्रवर्तीच्या पोटीं मरीचि नांवाने जन्माला आला. त्याने ऋषभ तीर्थकराजवळच दीक्षा घेतली होती. पण कठिण परिषह सहन न झाल्यामुळे त्यांनी दिगंबर मुद्रा सोडून मनःपूत आचरण्यास मुरवात केली. याने घातलेल्या नव्या मागांचेच पुढे सांख्यमतांत परिणमन झाले. सांख्यमत जैनतत्त्वज्ञानाशी बरंच जुळते पण तितकें तें खोल गेलेले नाही व त्यांत चारित्र नाही. असो. भरीचि मेल्यानंतर पांचव्या स्वगांत कुटिलदेव झाला. तेथील भोगावली संपल्यावर तो जीव कौलियक नगरीत कौशिकब्राह्मणाचे पोटी जन्माला आला. या जन्मांतहि मिथ्यात्वाचा जोर होता. तेथून हा जीव पहिल्या स्वर्गात देव झाला. पुढे स्थूणागर नगरांत भारद्वाज ब्राह्मणाचे घरीं पुष्पमित्र नांवानें तो जीव जन्मला. येथे त्याला हटयोगाची रुचि लागली व मेल्या (३३)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy