SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 195
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ कसोटीला उतरले. ३३ तुझ्या कालकूटस्वरूप वाणीस बाहेर येऊ देण्यास कसे नाखूष आहेत यांकडे थोडेसें तरी लक्ष दे. सुंदरी, अन्नछत्र ठेवणारा दाता कालेंकरून कृपण किंवा दरिद्री बनला तरी त्याची मजल माशीलाही फिरकू न देण्यापर्यंत जाईल ही गोष्ट शक्यच नाही. त्यांतून हे माझें हृदयनिवासिनीदेवते, मी तुला आपले सर्वस्व समर्पण करीत आहे. आजपर्यंत कोणत्याही भक्ताने आपल्या आराध्यदेवतेस श्रृंगारिलें नसेल, अशा प्रकारच्या सुवर्णरत्नालंकारांनीही मी तुला श्रृंगारीन. इतकेच नव्हे, तर, तुझ्या प्रसन्नतेसाठी मी आपल्या प्राणाचाही बळी समर्पण करीन! " कोण जाणे त्याचा हा चार्गटपणा आणखी किती लांबतो तो ! पण रूपिणीस तो अगदी असह्य झाल्यामुळे ती मोठ्या संतापानेच त्यास ह्मणाली:--- 'देवदत्त ! येथून चालता हो ! एक क्षणभरही मजपुढे उभा राहूं नकोस ! नीचा ! तुझ्या लोचटपणाने, खुषामतीने, द्रव्याच्या किंवा डागडागिन्यांच्या लालचीनें अगर पाजीपणाच्या कोट्याने मी पुन्हां त्या दुर्मार्गात पडेन असें कां तुला वाटते ? आतां या रूपिणीला जगांतली सारी संपत्ति आपल्या पातिव्रत्यरूपी हिन्यापुढे कांचेप्रमाणे वाटत आहे ! आणि तिचा पातिव्रत्याचा हिरा हरण करावा ह्मणून जगांतल्या साऱ्या हियामाणकांचा ढीग जरी कोणी तिजपुढे केला तरी ती त्यास अश्शी लाथेने झुगारील ! " ___ यावेळी रूपिणी आपल्या विचारांत इतकी तन्मय झाली होती, की, आपणापुढे खरोखरच कोणी रत्नाचा ढिगारा केला आहे असे तिला वाटून; ' अशी लाथेनें झुगारीन ' हे वाक्य उच्चारते वेळी खरोखरच तिने सपाटून लाथ लगाविली ! पण ती कोणत्याहि रत्नांच्या ढिगान्याला न लागतां त्या दुर्गणरूप कोळशाच्या राशीला-देवदत्ताला
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy