SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 181
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १४ रूपिणी. पण अशा वयांत तुमचा हा एवढा सुंदर आणि मुकुमार देह, उन्हातान्हांत कष्टत असलेला पाहून माझें काळीज तिळतिळ तुटत आहे ? महाराज, अशा तरुण वयांत या भलत्याच फंदांत पडून, आपल्या जिवाचे असे हाल कां बरे करून घेतां ? तुमच्या मनमोहक चेहयाला आणि सुंदर रूपाला पाहून मजसारख्या शेंकडों बायका रात्रंदिवस तुमच्या सेवेस हजर राहतील. तुह्मांला तोंडांतून एक अक्षर देखील काढावयाची गरज राहणार नाहीं ! मग महाराज असं कां बरं ? छे: सोडाच आतां हैं मौन आणि या गरिब दासीला करा पावन ! काय, आपण अजून देखील कांहींच बोलत नाहीं ? नाहीं बरं, मी नाही आपणांस अशी सोडावयाची !" एवढे बोलून त्या पतित प्रमदेने त्या निष्पाप मुनिवर्यांचा हात धरला. ( एवढा वेळपर्यंत तिची चर्पटपंजरी चालू होती, तरी ते मुनिवर्य स्तब्ध बसले होते. पण तिनें त्यांच्या हातास स्पर्श करितांच पतित भगिनी, हैं काय बरे करतेस" असे उद्गार त्या शांत. निर्विकार आणि निष्कलंक महात्म्याच्या तोंडून बाहेर पडले. NO. एवढेच उद्गार. पण त्याचा त्या पतित प्रमदेवर केवढा तरी विलक्षण परिणाम झाला. तिनें ताबडतोब त्यांचा हात सोडून दिला, आणि सर्वस्वी नाहीं तरी त्या उद्गारानें तिचा कामवेग बराच कमी झाला. पुरुषाच्या भाषणाचा किंवा स्पर्शाचा असा विलक्षण अनुभव तिला आजन्मांत आला नव्हता. तथापि पीळ जळतो पण वळ जळत नाहीं. ' या न्यायानें ती त्यांना लागलीच ह्मणाली: महाराज, माझी एवढीहि कामना आपण नाहीं कां पूर्ण करीत ? आपण जर माझा हा हेतु पुरविला नाहीं, तर मी या दुःखाने तळमळून तळमळून मरन. माझं मन आपणावर एवढं जडलं आहे कीं,
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy