SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 178
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ संकेत. त्याने या लोकांच्या कल्याणासाठी ग्रामदेवतांना अभिषेक करण्याचा एवढा सपाटा लाविला होता, की, त्यामुळे, गांवच्या खन्या नदीचा ओघ बंद पडून आभिषेकाच्या जलाचीच एक कृत्रिम नदी निर्माण झाली होती? या अनर्थाबद्दल एकदां खुद्द त्याच्या मुलानेच त्याच्याजवळ आश्चर्य प्रदर्शित केले. तेव्हां तो संतापूनच ह्मणाला--''मूर्खा, तुला बिलकुल अक्कल नाहीं ! या नदीच्या ओघाच्या उलटापालटीतच द्रव्याच्या ओघाचीही उलटापालट साठविली होती, समजलास ; तो ओघ इकडे वळला ह्मणूनच लोकांच्या घरांतील द्रव्याचा ओघही माझ्या घराकडे वळला! हा अखंड वाहणारा अभिषेक--जलाचा प्रवाह ह्मणजे तुला काय वाटते? हा नुसता आपल्या घरांत वाहणारा द्रव्याचा ओघ आहे ओघ ! समजलास-" बापाच्या या उत्तराने मुलगा अगदी चित झाला असल्यास त्यांत आश्चर्य कसले? नेहमी दुसऱ्याकडे मागण्याची खाली हात पसरण्याची या भिक्षुकाला इतकी संवय लागली होती, की, त्याचा चुकून देखील कधीं उपडा हात होत नसे. यायोगाने त्याला जेवण्याची देखील पंचाईत पडूं लागली. त्याच्या उताण्या हातावर बायकोने जेव्हां घास ठेवावेत तेव्हां कोटें त्याचे जेवण होई. मुलाच्या थोबाडीत वगैरे मारण्याचा त्याला कधी प्रसंग आलाच, तर तो उपड्या हातानेच मारीत असे! अशा माणसाच्या पोटी देवदत्ताचा जन्म झालेला, तेव्हां उद्योगा। बद्दल तिटकारा त्याच्या वयाबरोबरच त्याच्या मनांत वाढत गेला असल्यास त्यांत आश्चर्य कसले ? शिवाय त्याच्या बापाचा उपदेशही त्याच्या या वृत्तीला पोपक असाच असे. तो त्याला नेहमी ह्मणे:"करावयाचे आहे काय बेट्या आपल्याला काही उद्योग धंदा करून ?
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy