SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 16
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र चिन्ह म्हणून राजसूययज्ञ करवू लागले. पुढे पुढे विश्वस्थायी राहण्यासाठी यज्ञ करणे अवश्य आहे अशी कल्पना रूढ झाल्याचे दिसून येते. पुढे या यज्ञाला काहीतरी लाक्षणिक अर्थ येत गेला व पुरुष, काल, अनि व प्रजापति या सर्वाची एकरूपता दाखविण्यास सुरुवात झाली. यापासून पुढे आधारभूत तत्वाचा ( underlying Reality ) तपास सुरू झाल्यासारखे दिसते व पुढे ब्रह्माची कल्पना उत्पन्नः झाली. या ब्रह्मतत्वाची व नश्वर जगाच्या स्वरूपाची उपपत्ति लावण्यासाठी श्रीशंकराचार्याना म यावादाची कास धरावी लागली. या तत्वाची योग्य उपपत्ति उपनिषदकाली झालेली नव्हती म्हणूनच निरनिराळे भाष्यकार उपनिषदावरून निरनिराळे सिद्धांत काढण्याचा प्रयत्न करू लागले. सांप्रदायिक दृष्टया प्रत्येकाला थोडे बहुत यशहि आले आहे. याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, उपनिषद्काली वैदिक तत्वज्ञान एकस्वरूप झालेले नव्हते आणि सर्व उपनिषदें एकाच काळी लिहिली गेली नसल्यामुळे त्यांमध्ये परस्परविरोध दृष्टोस्पत्तीस येणेही अशक्य नाही. उपनिषद् म्हणजे वैदिक तत्वज्ञानी लोकांच्या स्वतंत्र विचाराचा एक महत्वाचा संग्रह आहे. त्यांमध्ये असेंहि काही नाविन्यपूर्ण विचार आहेत की, कोणत्याहि समंजस व विचारी माणसाला असा संशय येतो की, उपनिषदांतील विचार परंपरा वैदिक धर्मातीलच आहे की नाही. क्रियाकाण्ड उपनिषद्कालीं निष्फल व हलके ठरले. पुरोहितांचे प्रस्थ कमी झाले. मोठमोठाल्या यज्ञसत्राच्या ठिकाणी याज्ञवल्क्यादि ऋपिलोकांची ज्ञानसत्रे दिसू लागली. कित्येक उपनिषदांवरून असे समजते की, ब्राह्मणलोक ब्रह्मज्ञानासाठी क्षत्रियांकडे जात असत. म्हणजे यावरून असे म्हणण्यास हरकत नाही की, उपनिषद्काली ज्या क्षत्रिय वर्गाबरोबर आर्यपुरोहितांचा संबंध आला होता त्या क्षत्रियवर्गात तत्वज्ञानाची वाढ चांगलीच झालेली असावी व तो क्षत्रियवर्ग बहुतेक आर्यतर संस्कृतिपैकीच असावा. श्वेताश्वेतर उपनिषदावरून योग व अध्यात्मशास्त्राचा बराच विकास झालेला दिसतो. उपनिषत्कालीन वाङ्मयांत इन्द्र, अमि, आदिकरून देवांची पडछाया देखील पडलेली दिसत नाही. ब्राह्मणकाली पुनर्जन्माविषयी काहीच कल्पना नव्हती; परंतु पुनमरणाची भीति मात्र कित्यकांना वाटत असे. पुनर्जन्माच्या कल्पनेपासून पुनमरणाची कल्पना फारच भिन्न आहे. उपनिषद्काली मात्र पुनर्जन्माची कल्पना स्पष्टपणे पुढे आलेली दिसून येते. छान्दोग्य व बृहदारण्यक
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy