SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 132
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र पार्श्वनाथ व शौतिनाथांच्या मूर्ति आहेत. एलोराच्या जनगुंफा तर जगप्रसिद्ध आहेत. बोधानची मशीद पूर्वी जिनालय होत. पाटनचेरूला तर खोदावे तेथे जैन अवशेष सापडतात. येथे इ. सनाच्या सातव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत ज्या राजांनी राज्य केले ते जैनधर्मानुरागी होते. खुद्द पाटनचेरू गांवांन कितीतरी जिनालये आहेत. हे गांव हैद्राबादपासून अठरा मैलांवर आहे. · आता खुद्द आमच्याच गांवाचा विचार करूं. उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव. हे गांव बार्शी लाइनीवरील येडसी स्टेशनापासून चौदा मैलांवर आहे. शहरापासून तीन मैलावरील डोंगरांत सात जैनगुंफा आहेत. एका गुंफेत अवगाहनाची पार्श्वनाथांची बैठी मूर्ति आहे. ही गुफा करकंडुराजाने बांधली. आराधन कथा कोषांत एकशे तेरावी कथा राजा करकडची आहे. त्यांत खालील श्लोक आहेत. ' अत्रैव भरतेक्षेत्रे देशे कुन्तल संज्ञके। पुरे तेरपुरे नील महानीली नरेश्वरौ ४ ॥ अस्मात्तरेपुरादास्त दक्षिणस्यां दिशि प्रभो। गव्यूति कान्तरेचारू पर्वतस्यो परिस्थितम् ॥ १४४ ॥ धाराशिवपुरंचास्ति सहस्रस्तंभसंभवम् । श्रीमजिनद्रदेवस्य भवनं सुमनोहरम् ॥ १४५ ॥ करकंडश्च भूपालौ जैनधर्भधुरंधरः । स्वस्यमातुस्तथा बालदेवस्योश्चैः सुनामतः ॥ १९६ ॥ कारयित्वा सुधीःस्तत्र लवणत्रयमुत्तमम् । तत्प्रतिष्ठा महाभूत्या शीघ्र निर्माल्य सादरात् ॥ १९७॥ यावरून तेर नगरीत नील व महानील म्हणून नरेश्वर होते. तेरच्या दक्षिणेस धाराशिव असून ते जिनेंद्रदेवाचें मनोहर भुवनच आहे. जैनधर्मधुरंधर करंकडराजाने आपली आई व बालदेव यांच्या नांवाने तीन लेणी कोरली व मोठया समारंभानें जिनबिंबप्रतिष्ठा केली. धाराशिवाइन तेर आठ मैलांवर आहे. विठ्ठलभक्त गोराकुंभाराच हे गाव होय. येथे महावीरस्वामींचे जुने मंदिर आहे. इ. स. पहिल्या शतकापासून तेर नगरी विख्यात आहे. त्यांवळचे तिचे नाव तगर होते. इराणी प्रवाशानी या नगरीचे वर्णन केलेले आहे. अकराव्या शतकापर्यंत हे शहर फार भरभराटीत होते. तर्णानदीकाठचे उत्तरेश्वरमंदिर पूर्वी जिनालय होते. याप्रमाणे आमचा हा भाग प्राचीनकाली जैनराजांच्या, पंडिताच्या, शेटजींच्या व इतर श्रावकांच्या कर्तबगारीने फुलून गेलेला होता. तत्कालीन वैभवास म्लेंच्छांच्या आगमनामुळे व शैववैष्णवादि मिथ्यात्वी मतांच्या हाल डामुळे उतरती कळा लागली. ती इतकी की या हुल्लंडखोर पंथाप्रमाणेच (१३०)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy