SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 130
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र म्हैसूर भागांत ब्राम्हण म्हणूनहि काही जैन आहेत; पण ते फार थोडे, ज्यांनी मोठमोठी राज्ये केली ते जैनराजेहि विलयास गेले व त्यांचे संतान असले तरी ते क्षात्रवृत्तीहीन बनले आहे. ज्यांनी समुद्रपर्यटन करून परदेशांतून जैनधर्माचा प्रसार केला व तिकडून सुवर्ण आणून भरतभूमीला सुवर्णभूमि हे नामाभिधान प्राप्त करून दिले तें जैन वैश्यदक्षिणेत तरी फारसे राहिले नाहीत. गुजराथ व उत्तर हिंदुस्तानात मात्र जैन मुख्यत्वेकरून पैश्यच आहेत. शूद्रत्वाला हलकेपणा जैनसमाजांत कधीच नव्हता. हा उत्पादकवर्ग असून समाजाचा आधारस्तंभ होप. या वर्णाचेहि काही जैन दक्षिणेत आहेत. जैन, ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य कालाच्या पोटांत गडप झाले; पण त्यांचा लौकिक तात्त्विक व ऐतिहासिक ग्रंथरूपाने आणि चैत्यालयांच्या रूपाने आजतागायत मौजूद आहे. नुसत्या मुंबई इलाख्याचा विचार केला तरी मुंबई, अहमदाबाद ( करणवती), धंधका, धोलका, धोधा, कपडबंज, मातार, महुआ, नडियाद, उमरेठ, पावागड, चांपानेर, देसार, दाहोद, गोधा, भडोच, शुक्लतीर्थ, अकलेश्वर, साजोत, शाहाबाद, सूरत, रादोर, मांडवी, नवसारी, पाटण, ऊंझा, वडनगर, सरोत्रा, मुंजवर, संखेश्वर, सोजित्रा, ईडर, खंभात, तारंगा, वडाली, पालीठाणा, गिरनार, वढवाण, गोरखमढी, बल्लभीमपुर, तेलुजागुंफा, भद्रेश्वर, अंजार, इतकी अत्यंत प्राचीन मंदिरे असलेली स्थाने आहेत. त्याशिवाय जैनवस्ती आहे तेथे नवी मंदिरे झालीच आहेत. गुजराथनंतर कर्नाटकाचा विचार केला तर बेळगांव, हालसी, होंगल, हूली, कौन्नूर, नंदगड, कलहोले, मनोळी, सौंदत्री, कोकतनूर, विजापूर, ऐहोली, अरसी बाडी, बादामी, बागलकोट, हुनगुंद, पट्टदकल, तालीकोट, जैनपूर, सिंदगी, धारवाड, बंकापूर, हानगल, लक्कुंडा, मुळगुंद, शिग्गांव, हुबळी, लक्ष्मेश्वर, आदुर, डंबळ, देवगिरी, सुंदी, बनवासी, भटकळ, चितकुल, गरेसप्पा, होनावर वगैरे अनेक ठिकाणी जुन्यावस्त्या आहेत. म्हैसूर संस्थान तर जुन्या वस्त्यांचे आगरच आहे. मद्रास इलाख्याताल बहुतेक सर्व हिंदू मंदिरे पूर्वी जिनालये होती. आता महाराष्ट्राचा विचार करूं ठाण्याच्या आसपास पूर्वी जैन-राज्य होते. त्यामुळे कोंकणप्रांतांत बरीच प्राचीन जिनालये आहेत. अमरनाथ, बोरीवली, . डाहणु, कल्याण, कन्हेरी, गुंफा, सोपारा, तारापुर, वज्राबाई, वशाली, कुलाबा, चिबळ, गोरेगांव, कडागुंफा, महाड, पाले, कोलगुंफा, रायगड, रामधरणपर्वत, (१२८)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy