SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 123
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीर पश्चात्काल. दाखविल्याचे इतिहास पुराणांतून नमुद आहे तितके जैनसाधु व राजांच्या क्रौर्याचे दाखले नाहीत व ते स्वाभाविकच आहे. पण दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ या म्हणीप्रमाणे या काळांत वैदिकधर्माचे चांगले फावले. शंकराचार्य याकाळी अवतरल्यामुळे वैदिकधर्माचा पुनरुद्धार झाला असे म्हणावयास हरकत नाही. पण त्यांनाहि भगवान महावीर व म. बुद्धानी केलेल्या क्रांर्ताच्या मागे जाता आले नाही. या दोन महापुरुषांच्या पूर्वीचा वैदिकधर्म ते प्रचारांत आणू शकले नाहीत. पण त्या पायावर उभारलेला सुधारक धर्मच त्यांना प्रसृत करावा लागला. त्यानांहि हिंसात्मक यज्ञ तामसी म्हणून त्याज्य ठरवावे लागले. इंद्रादि देवतांची उपासना सोडावी लागली. जनांचा कर्मसंन्यास पत्करावा लागला. बौद्धभिक्षंचा वेष स्वीकारावा लागला. किंबहुना त्यांचा शून्यवादहि मायावादाच्या रूपाने ग्राह्य करावा लागला. एकंदरीत जुन्या वदिक कर्मकांडावर जैन व बौद्धतत्वज्ञानांच्या परिणामाचे फळ म्हणज शंकराचार्याचे मत होय असे म्हटल्यास त्यांत मुळीच आतिशयोक्ति होणार नाही. त्यावेळी रुद्र, विष्णु, देवी, गणपति, सूर्य वगरे देवतांची उपासना वैदिकांत रूढ झाली होती; ती पचायतन पूजा शंकराचार्यांनी मान्य करून सर्व वैदिकांना एक केले. त्यावेळी प्रगट असलेल्या उपनिषदावर त्यांनी संन्यासपर भाष्य रचली. जैन व बौद्धांचहि त्यांनी खंडन केले आहे. पण ते फारच थोडे. त्यामानाने त्या दोन तत्व ज्ञानांतून त्यांनी घेततेला भागच अधिक आहे. वैदिक साधुंचा वर्ग तयार करून ब्राह्मणेतरानांहि साधु होण्याचा मार्ग त्यांना घालून द्यावा लागला हा भ. महावीर व म० वुद्धाचा विजयच होय. जागजागी मठ स्थापून त्यांनी वैदिकधर्माच्या प्रसाराची सोय केली. याप्रमाणे वैदिकांची त्यांनी संघटना केल्यामुळे त्या धर्मात नवचैतन्य आले व राजाश्रयहि पुढे मिळाला. जैनचत्यालयाप्रमाणे व वुद्धमंदिराप्रमाणे वैदिक देवांची मंदिरेंहि बांधण्यांत येऊ लागली व समाज या धर्माकडे आकर्षिला जाऊ लागला. शंकराचार्यांचे हे स्मातर्मत वाढू लागल्यावर बौद्धमताचा जवळ जवळ लोपच होत चालला. पुढे महंमदीयांचे आगमन झाल्यावर निर्गुणोपासनेचीहि लाट उसळली. जैनांमध्ये तारणसमाजी व स्थानकवासी पंथ याचवेळी निघाले असावेत. वेदांताच्या प्रसारामुळे एकेश्वरीमताकडेहि जनता झुकू लागली होती. त्याप्रमाणे दक्षिणेत बाराव्या शतकांत बसवेश्वर अवतरून त्यांनी एकेश्वरीमत (१२)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy