SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 116
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र - वेळेस महावीरांचा आत्मा मोक्षशीलेकडे चालला त्या बेळी कृष्णपक्ष असूनहि प्रकाशाहून अधिक तेजस्वी प्रकाश सर्वत्र फाकला होता. त्यामुळे सर्व ठिका प्राणीमात्रांना महावीरनिर्वाणाची खबर कळली. समुद्र गंजू लागला होता. पृथ्वी कंपायमान होत होती. देवलोकांतील घंटा आपोआप बाजूं कागल्या होत्या. याप्रमाणे पावापुरीत महावीर तीर्थकरांचे निर्वाणकल्याणक झाले. पावापूरीचें वर्णन बँ. जुगमंदरलाल जैनी. एम्. ए. यांनी खालीलप्रमाणे केले आहे. ' पावापुरीत मातीचीच घरें आहेत. व तें लहानसेंच गांव आहे; पण ते अंतिम तीर्थकरांचे मोक्षस्थान असल्यामूळे पावापुरीला विशेष महत्व आहे. यात्रेकरूंसाठीं कित्येक टोलेजंग धर्मशाळा आतां तेथे झाल्या आहेत. पांच सहामंदिरेहि बांधली गेली आहेत. महावीरनिर्वाण तिथीला तेथे मोठी याला जमते. नेहमी यात्रेकरू येत असतातच; पण निर्वाण तिर्थापासून कांहीं महिनेपर्यंत यात्रेकरू बरेच येतात. ज्या तलावांतील बगिच्यांत महावीरस्वामी मोक्षाला गेले तो तलाव हल्लींहि आहे. त्यांत बगिचा केलेला असून त्यामध्ये महावीर - स्वामींचें चरणयुगुल आहे. तलावामुळे त्या तीर्थाला फारच शोभा आली आहे. पाण्यात मासे भरपूर आहेत. कमलहि ऋतुकालानुसार तलावांत असतात. भगवानांच्या चरण युगलापर्यंत तलावांत पूल बांधलेला आहे. त्यामुळे दर्शनेच्छु लोक सुलभपणें जाऊं शकतात. चरणयुगलाच्या दोन्ही बाजूस गौतर गणवर व सूधर्माचार्य गणधर यांचीहि पावले आहेत. या तीर्थाचें दर्शन केल्यामुळे विशेष पवित्र भावना यात्रेकरूंच्या मनांत आल्याशिवाय रहात नाहींत " असो. वीरनिर्वाणाच्या दुसरे दिवशीं ठिकठिकाणचे राजे व इतर श्रावक, श्राविका साधु साध्वी महावीर तीर्थकारांच्या अवशेषाचे दर्शन घेण्यास आले होते. त्या दिवशी रात्री सर्वत्र दीपोत्सव करण्यांत आला होता. " महावीरस्वामींचा आत्मा मोक्षाला गेला ही आनंदवातीच होती. त्याबद्दल दु:ख करणें हें अज्ञान होय. एवढेच अज्ञान गौतम गणधरांना होतें व इतर दृष्टीनें तें महाज्ञानी व चारित्रसंपन्न असूनहि त्यांना केवलज्ञान होत नव्हते. पण महावीरस्वामींच्या निर्वाणानंतर केलेल्या दुःखाचा विचार करून तसे करणें अयोग्य होते असें जाणल्याबरोबर गौतम गणधरांनाहि केवलज्ञान झाले व नंतर सत्तर वर्षांनीं तेहि मोक्षाला गेले." असा उल्लेख श्वेतांबर शास्त्रांतून पाहावयास मिळतो. व दिगंबरांत महावीर- स्वामीच्या निर्वाणानंतर गौतमस्वामींना केवलज्ञान झाले व त्यांनी बारा वर्षे बिहार ( ११० )
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy