SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 109
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र (७) ज्याने सत्य जाणलें तो मरणानंतर जिवंत असतो काय ? ( ८ ) तसें नसेल तर त्याचे काय होतें ? ( ९ ) किंवा जिवंत असतो व नसतोहि ? (१०) किंवा तो जिवंत नसतो व जिवंत असतो असेंहि नव्हे ? याप्रमाणे स्याद्वाद - शैलीची नक्कल करून प्रश्न विचारण्यांत आले; पण त्यावर म. बुद्धांचे एकच उत्तर कीं, हे पोत्थपाद, या विषयावर मी आपले मत प्रगट केलेलें नाहीं. विषयसेवन कां अधिक सेवन करूं नका ? तर दुःख होतें म्हणून. पण दुःख कां होत यांचे कारण दिलें गेलें नाहीं. विषयसेचनांत सुखहि आहे व दु:खहि आहे; पण दुःखविरहित सुखाचा मार्ग अंधुकपणेच म. बुद्धांनी दाखविला आहे. शिवाय असे का होते याला उत्तर नाहीच. निदान भरतभूमीत तरी तत्वज्ञानाचे बूढ नसलेले धर्म टिकणे अशक्य आहे व म्हणूनच येथें बौद्धधर्म नामशेष झाला. म. बुद्धानंतरच्या भिक्षुनी ही त्रुटि ओळखून तत्वज्ञान रचलें; पण म. बुद्धाने घातलेल्या पायावरच तें रचावें लागलें. वैदिक धर्मानें भारतीय तत्वज्ञान पुष्कळ आत्मसात करून घेतले; पण यज्ञसंस्था, बहुदेवतापूजन वगरे मूळ पाया कांहीं सोडला नाहीं. तसेच बौद्धधर्माचे बाबतींतहि झाले. व असेच होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच मूळ धर्मसंस्थापकाचे महत्त्व विशेष मानले जाते. प्रथम तीर्थकर ऋषभदेवानींच भारतीयतत्वज्ञानाचा पाया असा सुंदर घालून दिल की तो कालवयी बदलावा लागत नाहीं व परिपूर्ण आहे. स्वच्छंदानें ज्यांनी तो पाया सोडून दुसरीं मतें प्रस्थापित केलीं तीं टिकूं शकत नाहति; एक जैनशासन मात्र अव्याबाध व शुद्ध राहिले आहे. जैन तत्त्वज्ञानाची बालजीव टिंगल करूं शकतील; पण त्यांत कोणालाहि दोष काढता येणार नाहीं. अवघड आहे म्हणतां येईल; पण ध्येयसाधनास अपुरें असें म्हणता येणार नाहीं. 66 बुद्ध व महावीर या पुस्तकांत गुजराथविद्यापिठाचे रजिस्टार श्री. मश्रूवाला खालीलप्रमाणे लिहितात, बुद्ध व महावीर हे आर्यांच्या दोन स्वभावाचे द्योतक आहेत. एक प्रवृत्तिपर स्वभाव व दुसरा निरृत्तिपर स्वभाव. या जन्मानंतर काय होणार आहे याची फिकीर न करता चालूं जन्मांत जास्तीत जास्ती खरें सुख कसे मिळेल याची चिंता म. बुद्धांनी केली. जन्मच जर दुःखकारक असेल तर तो आतां झालाच आहे. पुढे पुन्हा जन्म असेल तर त्या जन्मांतील सुर्खे या जन्मति केलेल्या सुकृत्यावरच अवलंबून आहेत. म्हणून या जन्मीं पुण्य करणे इह व परलोकीं सुखकारक आहे. असा विचार करूनच या जन्मां ( १०० )
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy