SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 106
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ भगवान महावीर व महात्मा बुद्ध. धर्मोपदेशास वयाच्या ४३ व्या वर्षी सुरवात केली. म.बुद्धांनी सहा वर्षे तपश्चर्याकरून वयाच्या ३५ व्या वर्षी धर्मोपदेशास प्रारंभ केला. बोधिवृक्षाखाली ज्ञान • झाल्यानंतर ते प्रथम काशीस आले हे वर सांगितलेच आहे. नंतर क्रमाने ते उरुवेला, गयासीस, राजगृह, कपिलवस्तु, श्रावस्ती, फिरून राजगृह, नंतर श्रावस्ती, फिरून राजगृह, पुन्हां काशी, भद्दिय, पुन्हां राजगृह, पुन्हां काशी, अन्धविंदु, पुन्हा राजगृह, पाटलिग्राम, कोटिग्राम, नातिका, आपन, कुस्तीनारा, आतूम, पुन्हा श्रावस्ती, फिरून राजगृह, दक्षिणागिरी, वैशाली, पुन्हां काशी, ५न्हां श्र वस्ती, चंबा, कोशांबी, पारिलेट्यक, पुन्हां श्रावस्ती, बालकालोंकग्गांव, बेलु व कुभानारा वगैरे गांवी गेले होते. आसपास विक्षु पाठवून त्यांनी मतप्रचार केला होता. कालानुसार नव्या गोष्टी त्याना ज्या वाटल्या त्या ते भिक्षद्वारा प्रसृत करीत. त्यांचा धर्ममार्ग अष्टागमार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. सत्यदृष्टि, सत्यउपदेश, सत्यवार्ता, सत्यआचरण, सत्य जीवन, सत्य एकाग्रता, सत्य प्रयास व सत्य ध्यान हे ते आठ मार्ग होत. पहिला मार्ग सम्यक्दर्शनाशी जुळता आहे. पण दोहोंच्या दृष्टिबिंदूत महत्वाचा फरक आहेच. पुढील तीन मन, वचन कायेचे तीन सम्यक् योग म्हणता येतील. पांचवा मार्ग सम्यक्चारित्राचा एक भाग होय. साहवा मार्ग धर्मध्यानासारखा आहे. सातवा शुद्ध परिणामाबद्दलचा आहे व आटवा मार्ग शुक्लध्यानाशी थोडा जुळेल, या अष्टांग मार्गाचा उपदेश भि व भिक्षुर्णासाठी आहे; गृहस्थासाठी हा नव्हे. पण यातील बहुतेक जैन श्रावकांसाठीच जैन ग्रंथांतून सांगितलेला आहे. बौद्धशास्त्रांतून आठ साल सागितले आहेत. ते जनी बारा शीलवतांशी बरंच जुळतात. अहिंसा अम्ने, पापत्याम किंवा ब्रह्मचर्य, सत्य, मादक वस्तंचा त्याग, रात्री भोजन व अनियमित भोजनत्याग, नर्तन, गायन वगरे बिलासांचा त्याग व भूमिः य्या हैं। आठ व्रते होत दीघनिकाय नांवाच्या बौद्धग्रंथात पहिल्या चार शीलाची पाणातिपात, अदिनादान, अब्रह्मचर्य, मुसावादत्याग, अशीच नांवे दिली आहेत. चातुः सांत विहार बंद ठेवण्याची पद्धत जैनमुनीवरूनच घेतली आहे. आस्रव, संवर, हेहि शब्द बौद्ध ग्रंथांत आहेत. यावरून जैनत वज्ञानाचा बौद्धावर किती रिगाम झाला आहे ते स्पष्ट दिसून येते. पण दुःखाची गोष्ट एवढीच की,सर्व र उनी विकृत किंवा विपरति करून टाकले आहे. अति भोगोपभोग भोगू नये व तश्वरण करूं नये हा मध्यम मार्ग ज्यांनी जाणला ते बौद्धाकडून हत माल जात. (९७)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy