SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 42
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ सन्मति - तीर्थ वगळून पहा ! मग सगळेच नीरस, सुने सुने वाटू लागेल. 'माखनचोर' बालकृष्ण, राधा-गोपिका-वल्लभ किशोर, दुष्ट निर्दालक युवक, द्वारका वसविणारा प्रौढ, महाभारतातीलअर्जुन - सारथी आणि अखेर द्वारकाविनाश जड अंत:करणाने पहाणारा वृद्ध अशी अक्षरश: हजारो रूपे त्या नटरंगी श्रीकृष्णाची आहेत. गोकुळ, वृंदावन मथुरा - द्वारका असा त्याच्या आयुष्याचा प्रवास आहे. तो तो आयुष्यकाळ त्याने समरसून घालवला परंतु पुन्हा पुन्हा मागे वळून भूतकाळात रमला नाही. हिंदू पुराणांनी त्याला आठवा अवतार मानला. जैनांनी त्या ६३ शलाकापुरुषात 'वासुदेव' (अथवा 'नारायण') हे पद दिले. पूतनावध, कंसवध, जरासंधवध इ. कृत्यांची शिक्षा म्हणून जैन पुराणांनी त्याला नरकात पाठविले. तरीही त्यांच्या आंतरिक निरासक्तीचे आणि विलक्षण प्रभावाचे मर्म ओळखून त्याच्या 'भावी तीर्थंकरत्वा'चाही दिलासा दिला. अर्धमागधी आगमांमध्ये कृष्णकथांना स्थान दिले. बौद्धांनीही कृष्णाला गौतमबुद्धाच्या जातककथांशी जोडून घेतले. बौद्धांच्या मते, गौतम बुद्ध 'घटपंडिता'च्या जन्मात असताना, श्रीकृष्ण त्याचे बंधू होते. बौद्धांच्या तुलनेत जैन साहित्यात कृष्णकथा अधिक येतात कारण २२ वे तीर्थंकर अरिष्टनेमींशी असलेले कृष्णाचे नाते ! ते सर्व आपल्याला माहीत असल्याने पुनरावृत्ती नकोच ! काश्मिरी कवी 'क्षेमेन्द्र' याने कृष्णचरित्राच्या अंतरंगाचा ठाव घेऊन त्याच्या वृत्ती-प्रवृत्तींमागची सूत्रे शोधण्याचा प्रयत्न केला. प्रथम सूत्र आहे त्याची 'अमला प्रज्ञा' (स्व-पर-हितकारक शुद्ध बुद्धी) आणि दुसरे सूत्र आहे- 'सूक्ष्म नीति:'म्हणजे धर्म-अधर्माच्या सीमारेषा ओळखून, प्रसंगी अपवादात्मक मार्गाचा अवलंब धर्मसंस्थापनेसाठी करण्याचा त्याचा मुत्सद्दीपणा आणि राजनीतीतले कौशल्य ! सन्मति - तीर्थ हिंदूंनी जी 'प्रस्थानत्रयी' मानली आहे ती आहे उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि गीता. त्यापैकी उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रे, जैनांच्या भाषेत 'निश्चयनयावर', अर्थात् आत्मज्ञानावर आधारित ग्रंथ आहेत. 'गीता' सर्वस्वी वेगळी आहे. ती व्यवहारनयावर आधारित आहे. त्यात रोजच्या जीवनातील कर्तव्यकर्मांना आणि तरीही 'निष्काम' तेला महत्त्व दिले आहे. गीतेत तत्त्वज्ञान आहे आणि चोख व्यवहारही आहे. महाभारतातील - घटनाक्रम आणि कृष्ण पांडव - कौरव-संबंध यांना सोडून गीतेचा अभ्यास करताच येत नाही. गीतेतला उपदेश अर्जुनाला दिलेला 'फुकटचा सल्ला' नसून, कृष्ण जसा जगला तसाच उपदेश त्याने अर्जुनाला दिला. कृष्णाच्या जीवनाची अटळ शोकांतिका म्हणजे त्याला आयुष्यभर प्रायः स्वकीयांशीच लढावे लागले. त्याचे शत्रू म्हणजे त्याचीच आत्ते-मामे-मावसभावंडे होती. मुत्सद्दीपणाबरोबरच पराक्रम त्याच्या नसानसात भरलेला होता. त्यामुळे त्याने (महाभारताचे अंतिम युद्ध सोडता) अनेक युद्धात भाग घेतला, नेतृत्व केले. जैनांनी ज्याला 'प्रतिवासुदेव' मानले तो आहे 'जरासंध'. मगधाचा बलाढ्य सम्राट. कृष्णाचा आत्तेभाऊ. अंग-वंग- कलिंगातील गणतंत्र (त्याकाळची लोकशाही) पद्धत सोडून त्याला साम्राज्यशाही प्रस्थापित करायची होती. ८६ राजांना बंदिवान करून अखेर 'नरमेधा'त त्यांचा बळी द्यायचा होता. भारतभरातील अनेक राजे त्याच्या दडपशाहीत सामील होते. जरासंधाचा अंमल सर्वत्र चालू झाला तर होणारा अनर्थ ध्यानी घेऊन, या मुत्सद्दी कृष्णाने एक-एक करून त्याच्या पाठीराख्यांना शरण आणले. अखेरीस भीमाच्या सहाय्याने विलक्षण कट करून त्याचा वध केला. कृष्ण स्वतः कधीही कुठलाही 'राजा' झाला नाही. मगधाचे राज्य त्याने जरासंधाच्या ७६
SR No.009869
Book TitleSanmati Tirth Varshik Patrika
Original Sutra AuthorN/A
AuthorNalini Joshi
PublisherSanmati Tirth Prakashan Pune
Publication Year2012
Total Pages48
LanguageHindi, Sanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy