SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 15
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ देठाचा आकार असणारे वाद्य वाजविणे, एक प्रकारचे द्यूत (उ), कमळना नाळ छेदवानी कळा (गु). नाली म्हणजे तालवाद्य असा अर्थ आहे (गीलको), पण मागे ‘वाइय' येऊन गेले असल्याने, तो अर्थ येथे घेण्याचे कारण नाही. नालीक म्हणजे भाला (गीलको), आणि ‘णालिआ' म्हणजे आपल्या शरीरापेक्षा चार बोटे लांब काठी (पासम), असे अर्थ आहेत. हे दोन अर्थ लक्षात घेऊन, नालियाखेडचे पुढील अर्थ होतात. भाल्याचा खेळ, भाला फेकण्याचा खेळ ; लहान भाल्याच्या टोकाला दोरी बांधून कसरत दाखविण्याचा खेळ ; बोथाटीचा खेळ. तसेच, नालिया शब्दाची संस्कृत छाया 'नाडिका' अशीही होते. नाडिका म्हणजे हातचलाखी, शरीरातील नाडी (आपटे कोश), असा अर्थ आहे. त्याला धरून, हातचलाखीचा खेळ, अथवा शरीरातील विशिष्ट नाड्या दाबण्याची कला, असेही अर्थ होतात (आ). (५४) पत्तच्छेज्ज (पत्रच्छेद्य) :- पानांवरील कोरीव काम (बा), पानांप्रमाणे आकृत्या६१ काढणे (वै), बाणाने झाडांवरील१ पानांचा वेध करणे (उ), पत्र छेदवानी कळा (गु)-पत्र म्हणजे झाडाचे पान तसेच धातु इत्यादीचा पत्रा असाही अर्थ आहे. ते लक्षात घेतल्यास पुढील अर्थ होतात. पाने इत्यादी कापून वेगळ्या आकृत्या तयार करणे, वस्त्र इत्यादीवर विविध पानांच्या आकृत्या काढणे ; धातूंचे पत्रे कापणे ; तसेच धातु इत्यादींच्या पत्र्यांवर काम करणे (आ). (५५) कडच्छेज्ज/कडगच्छेज्ज (कट-/कटक-च्छेद्य) :- बांगड्यांवर५२/कांकणावर कोरीव काम करणे (बा), वर्तुळाकार आकृति काढणे (वे), बांगडीतून/कंकणातून/कड्यामधून बाण सोडणे (3), कडा, १२चूडी, कुंडळ छेदवानी कळा (गु).-कट म्हणजे गवत, बांबूचा पदार्थ, फळी/तक्ता असे अर्थ आहेत (गीलको). कड म्हणजे तासलेले लाकूड, पर्वताचा एक भाग, आणि कडा, असे अर्थ आहेत (पासम). यांना अनुसरून पुढील अर्थ होतात :- गवत कापणे, बांबू छिलणे, फळ्या कापणे, लाकूड तासणे, पर्वताचा एकादा भाग फोडणे. (पर्वताच्या कड्यावर चढणे-उतरणे हा अर्थ होईल काय ?) (आ). (५६) सज्जीव (सजीव) :- जीवन६४ देणे (बा,वै), मृत माणसांना जिवंत करण्याच्या मंत्रांचे ज्ञान (उ), मरेलाने (मूर्छा पासेलाने) मंत्रादिक वडे जीवतो करवानी कळा (गु).-बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्याची कला. (शरण आलेल्याला जीवदान देणे असा अर्थ होईल काय ? (आ)). (५७) निज्जीव (निर्जीव) :- जीवित५ घेणे (बा), जीवित५ काढून घेणे (वै), सोन्यासारख्या धातूंना औषध या स्वरूपात वापरण्यास योग्य करण्याची कला (उ), जीवताने मंत्रादिक वडे मरेला जेबो करवानी कळा (गु).-येथे निर्जीव हा शब्द बेशुद्धी व मरण या दोन अर्थांनी घेता येईल. मरण हा अर्थ घेतल्यास :- शिरच्छेद, फास, सूळ, जाळणे, बुडविणे, तरवार/भाला खुपसणे, गदा इत्यादींनी मस्तक फोडणे, गळा दाबणे, नाकतोंड दाबो इत्यादींनी जीव घेणे. बेशुद्धी असा अर्थ घेतल्यास :- पीडा/मार, मोहिनी विद्या, मंत्र, औषध इत्यादींनी बेशुद्ध करणे (आ). (५८) सउणरुय (शकुन रुत) पक्ष्यांचे ओरडणे (बा), पक्ष्यांचे आवाज (वै), भिन्न भिन्न पक्ष्यांचे आवाज ओळखण्याची कला (उ), कागडा, घुबड, विगेरे पक्षीओना शब्द जाणवानी कळा (गु).-तसेच, निरनिराळ्या पक्ष्यांप्रमाणे स्वत:च्या तोंडातून आवाज काढण्याची कला (आ). (२) तीन ग्रंथांत समान असणाऱ्या कला (अ) नाया, राम, औप यांत समान असणाऱ्या कला : १. पासय (पाशक) :- फाशांनी खेळणे (बा,वै,उ,गु). याच्या जोडीने फास किंवा जाळे तयार करण्याची अथवा फाशी देण्याची कला, असा अर्थ घेता येतो (आ). २. विलेवणविहि विलेपनविधि :- सुगंधी पेस्टचे नियम (वै), विलेपनाची कळा (उ), विलेपननी वस्तु जाणवी, तैयार करवी चोळवी विगेरेनी कळा (गु).-सुवासिक वा औषधी विलेपने तयार करणे आणि वापरणे
SR No.009845
Book TitleJain Vidyache Vividh Aayam Part 05
Original Sutra AuthorN/A
AuthorNalini Joshi
PublisherNalini Joshi
Publication Year2011
Total Pages25
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size23 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy