SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 17
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ * व्रतविचार * वैदिक परंपरेत ऋग्वेद काळात, 'धार्मिक अथवा पवित्र प्रतिज्ञा किंवा आचारणसंबंधी निबंध', या अर्थाने 'व्रत' शब्दाचा प्रयोग होत होता. ब्राह्मणग्रंथात 'व्यक्तीचा विशिष्ट वर्तनक्रम अथवा उपवास', या दोन्ही अर्थांनी 'व्रत' शब्द येऊ लागला.२२ स्मृतिग्रंथात प्रायश्चित्ताचे विधान' व्रतरूपाने आले.२३ पुराणग्रंथात तिसऱ्या-चौथ्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत, व्रतांचे स्वरूप व उद्देश बदलत गेले व संख्या वृद्धिंगत होत गेली. व्रतांच्या मूळ अर्थांमध्ये संकल्पित कृत्य, संकल्प, प्रतिज्ञा व इच्छा हे अर्थ जोडले गेले. त्यामुळे व्रतांना ऐहिकता, काम्यता प्राप्त झाली. व्रते करण्यास स्त्रियांना व निम्न वर्णियांनाही स्थान मिळाले. ही व्रते अत्यंत आकर्षक स्वरूपाची होती. जैनधर्मात आगमकाळापासून ‘व्रत' शब्दातील ‘वृत्' क्रियापदाचा अर्थ मर्यादा घालणे, नियंत्रण करणे, रोकणे, संयम करणे असा होता. म्हणूनच जैन परंपरेत व्रतासाठी विरति, विरमण असे शब्द येतात. याच अर्थाने जैनांनी पूर्ण विरतीला ‘महाव्रत' व आंशिक विरतीला 'अणुव्रत' म्हटले आहे.२६ ही व्रते प्रासंगिक नसून आजन्म परिपालन करण्याची आहेत. हिंदुधर्मामध्ये पौराणिक काळात जसजसे व्रतांचे स्वरूप बदलत गेले, तसतसा जैन समाज व विशेषत: महिलावर्ग, त्याकडे आकृष्ट होऊ लागला असावा. त्यामुळे अकराव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत, जैनसमाजातही आचार्यांनी विधि-विधानात्मक व्रतांचा प्रचार केला. जैनांच्या दोन्ही संप्रदायात प्रतिमा, पूजा, विधिविधाने, प्रतिछा, यंत्र-मंत्र इ. चा समावेश झाला. परिणामी लोकाशाहसारख्या श्रावकास, मूर्तिपूजेविरूद्ध स्थानकवासी संप्रदाय स्थापन करण्याची प्रेरणा झाली. हिंदू आणि जैन समाज सतत संपर्कात असल्यामुळे, त्यांच्यामध्ये अनेक गोष्टींचे आदान-प्रदान कसे होते गेले असावे, यावर वर वर्णन केलेला व्रतांचा इतिहास, हे एक बोलके उदाहरण आहे. * समाधिमरण * प्रायोपवेशन किंवा संजीवन समाधी इ. नावांनी धार्मिक मरणाचा स्वीकार करणे, हे हिंदुपरंपरेला काही नवीन नाही. तथापि हिंदू वातावरणात असे मरण स्वीकारल्याची उदाहरणे अगदी मोजकी आढळतात. शिवाय ह्या मरणासाठी स्वीकारलेल्या प्रक्रियेचा, विशेष बोध करणारे साहित्य निर्माण झालेले दिसत नाही. __ जैन परंपरेत आगमकाळापासून मृत्युविचाराला विशेष स्थान दिसते. भगवती आराधनेसारख्या दिगंबरग्रंथात आणि श्वेतांबरांच्या अनेक प्रकीर्णकात संलेखना, संथारा, समाधिमरण, पंडितमरण, अंतिम आराधना अशा विविध प्रकारे संथाऱ्याचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. साधु व गृहस्थ दोघांनीही केलेल्या संथाऱ्याचा स्वीकार आणि आजही या प्रथेचे असलेले प्रचलन, हे हिंदूंपेक्षा असलेले वेगळेपणच मानावे लागेल. * कर्मक्षयाचा विचार * भवकोटी संचित कर्मांचा या मानवी आयुष्यात, आपण आपल्या प्रयत्नाने क्षय करावयाचा आहे, ही संकल्पना दोन्ही परंपरेत दिसते. संचित कर्मे पुष्कळ असल्यामुळे व वेगवेगळ्या वेळी कर्मबंध झाल्यामुळे त्यांच्या क्षयाचा एक विशिष्ट क्रम सांगणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदू परंपरेतील ग्रंथ ही अपेक्षा पूर्ण करीत नाहीत. 'ज्ञानाग्निः सकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ।२८ हे विवेचन कर्मक्षयाबाबत पुरेसे ठरत नाही. जैन परंपरेने या कर्मक्षयाला 'निर्जरा' या नावाने तात्विक दर्जा दिला आहे.२९ म्हणून निजरेची व्याख्या, निर्जरेचे प्रकार,३१ निजरेचे अधिकारी,३२ संवरयुक्त तपाने होणारी निर्जरा,३३ गुणस्थान व निर्जरा,४ समुद्घात व निर्जरा,५ निर्जरेचा क्षपणविधि अशा प्रकारे केलेला विविधांगी विचार हे जैन परंपरेचे वैशिष्ट्य ठरले.
SR No.009844
Book TitleJain Vidyache Vividh Aayam Part 04
Original Sutra AuthorN/A
AuthorNalini Joshi
PublisherNalini Joshi
Publication Year2011
Total Pages25
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size23 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy