SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 17
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ९. जैन साहित्यातील कथाभांडार (भाषण, आकाशवाणी पुणे केंद्र, जून २०११) श्रोतेहो, आपल्या भारत देशात प्राचीन काळापासून आत्तापर्यंत जे जे एतद्देशीय साहित्य अर्थात् वाङ्मय निर्माण झालं ते तीन भाषांमधे लिहिलेलं दिसतं. त्या भाषा म्हणजे संस्कृत, प्राकृत आणि पाली. वैदिक परंपरेचे अर्थात् हिंदधर्माचे ग्रंथ प्रामुख्यानं संस्कृतात आहेत. बौद्ध धर्माचं आरंभीचं साहित्य ‘पाली' भाषेत आहे. नंतरचं साहित्य संस्कृतात आहे. बौद्ध धर्म भारताबाहेर पसरल्यावर त्या त्या प्रांतांमधल्या प्रादेशिक भाषांत व लिपींमध्ये बौद्ध साहित्याचं लेखन झालं. प्राकृत' या ऋग्वेदकाळापासून आम समाजात प्रचलित असलेल्या बोली भाषा आहेत. त्या प्रांतानुसार, लोकांच्या व्यवसायानुसार वेगवेगळ्या होत्या. आरंभी त्या केवळ दैनंदिन बोलचालीपुरत्याच मर्यादित होत्या. झवी सनापूर्वी ६ व्या शतकात भ. महावीर आणि भ. गौतम बुद्धांनी आपापले धर्मोपदेश अर्धमागधी आणि पाली या लोकभाषांमधे दिले. पहिल्यांदा काही शतकं ते तोंडी परंपरेनं पाठ करून जपले गेले. नंतर नंतर बोली भषांचं स्वरूप बदलत गेलं आणि स्मरणशक्तीही क्षीण होऊ लागली. परिणामी इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर प्राकृत साहित्य ग्रंथबद्ध होऊ लागलं. धार्मिक ग्रंथांखेरीज लौकिक ग्रंथांचीही निर्मिती होऊ लागली. ‘पाली' ही भाषा ‘मागधी' भाषेवर आधारित अशी प्राकृत भाषाच आहे. परंतु ‘पाली'चा स्वतंत्रपणं आणि विस्तारानं खूप अभ्यास झाला. शब्दकोषही बनले. इतर प्राकृत भाषांचा अभ्यास त्या मानानं नंतर झाला. त्यामुळं 'प्राकृत' या नावातून ‘पाली' भाषा वगळण्याचा प्रघात पडला. साहित्य अर्थात् वाङ्मयामध्ये अनेक प्रकार व अनेक विषय समाविष्ट असतात. त्यापैकी जैनांनी लिहिलेल्या प्राकृत साहित्यातील कथाभांडाराचा आज आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. ___अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, अपभ्रंश आणि संस्कृत या पाच भाषांमध्ये जैनांनी जवळजवळ १५ शतके अर्थात् दीड हजार वर्ष सातत्यानं लेखन केलं. त्यापैकी महाराष्ट्री भाषेत तर कथांची खाणच उपलब्ध आहे. तोंडी परंपरेनं चालत आलेल्या कथा तर त्यात नोंदवलेल्या आहेतच परंतु क्लिष्ट विषय सोपा करून समजावून सांगण्यासठी नवनवीन कथांची निर्मिती देखील केलेली दिसते. 'कथा' हा एकच वाङ्मयप्रकार किती विविध रूपांनी नटून अवतरतो त्याची गणतीच नाही. कधी चार ओळींची छोटीशी चातुर्यकथा दिसेल तर कधी ४०० पानांची दीर्घकथा ! आत्ता आपण जिला कादंबरी म्हणतो क्लिा प्राकृतमधे कहा' अर्थात् 'कथा'च म्हटलं आहे. प्राकृत साहित्यात आख्यानं, उपाख्यानं, दृष्टांतकथा, रूपककथा, अद्भुतकथा, बोधकथा, प्रश्नोत्तररूपकथा, प्राणी-पक्षी-कथा यांची नुसती भरमार आहे. वेगवेगळ्या जैन आचार्यांनी कथांचं वर्गीकरण सुद्धा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारांनी सादर केलं आहे ! दशवकालिक नावाच्या ग्रंथाच्या व्याख्येत आचार्य हरिभद्रांनी कथेचे परिणाम लक्षात घेऊन वर्गीकरण केलं आहे. तप, संयम, दान, शील अशा सद्गुणांचा परिपोष करणारी कथा ‘सत्कथा' असते. अज्ञान, अंधश्रद्धा, पाखंड वाढवणारी कथा ही 'अकथा' असते. राग, द्वेष, मत्सर, सूड, चोरी इत्यादी दुर्गुणांनी समाजात विकृती निर्माण करते ती 'विकथा' होय. तीन पुरुषार्थांवर आधारित असं कथांचं वर्गीकरण ‘कुवलयमाला' या दीर्घ काव्यकथेत आरंभी नोंदवलं आहे. धार्मिक गुणांचा विकास करते ती 'धर्मकथा'. विद्या, शिल्प, अर्थार्जनाचे उपाय, त्यासाठी केलेलं परदेशगमन इ. प्रयत्न, तसेच साम-दान (दाम)-दंड-भेद यांचा विचार जिच्यात असतो ती 'अर्थकथा' ! रूप-सौंदर्य, तारुण्य, प्रेम, स्त्रीदाक्षिण्य यांना प्रकट करते ती कामकथा'. या तिन्हींच्या मिश्रणानं तयार होते ती 'मिश्रित' अथवा 'संकीर्ण'
SR No.009842
Book TitleJain Vidyache Vividh Aayam Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorNalini Joshi
PublisherNalini Joshi
Publication Year2011
Total Pages28
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size23 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy