SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 9
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (१४) अनंतनाथ (१५) धर्मनाथ (१६) शांतिनाथ (१७) कुन्थुनाथ (१८) अरनाथ (१९) मल्लिनाथ (२०) मुनिसुव्रतनाथ (२१) नमिनाथ (२२) नेमिनाथ (२३) पार्श्वनाथ (२४) महावीर (वर्धमान) वर्तमान कालचक्रात जैनधर्माचा आरंभ प्रथम तीर्थंकर ऋषभदेवांच्या उपदेशापासून झाला. पारंपारिक मान्यतेनुसार ऋषभदेव लक्षावधी वर्षांपूर्वी होऊन गेले. त्यांच्या उंची, आयुर्मान हे सर्व कल्पनातीतपणे प्रदीर्घ वर्णिलेले दिसते. वैदिक परंपरेचा सर्वात प्राचीन उपलब्ध ग्रंथ जो 'ऋग्वेद' त्यात ऋषभदेवांविषयीचे उल्लेख व गौरवोद्गार दिसतात. 'भागवतपुराणा'त तर त्यांचे समग्र चरित्रच वर्णिलेले दिसते. __ अभ्यासकांनी ज्यांची ऐतिहासिकता मान्य केली आहे असे चार तीर्थंकर दिसतात. त्यांपैकी ऋषभदेव हे पहिले होत. काळाचा टप्पा सामान्यत: लक्षात येण्यासाठी असे म्हणता येईल की रामायणकाळापूर्वी विसावे तीर्थंकर 'मुनिसुव्रत' होऊन गेले. एकविसावे तीर्थंकर नमि' हे विदेहाचे राजे जनक यांच्या वंशातील पूर्वज राजर्षि अण्याची शक्यता आहे. बाविसावे तीर्थंकर नेमि' (अरिष्टनेमि) हे महाभारतातील वासुदेव कृष्णाचे ज्येष्ठ चुलतबंधू होते. तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ' हे भ. महावीरांपूर्वी २५० वर्षे होऊन गेले. भ. 'महावीर' हे चोविसावे तीर्थंकर इ.स.पूर्व ६ व्या शतकात होऊन गेले. पार्श्वनाथ आणि महावीर यांची ऐतिहासिकता आता वादातीत मानली जाते. (४) तीर्थंकर : નૈનવર્શનાનુસાર માનવી માયુષ્યાને સર્વોન્ચ ધ્યેય મોક્ષ અથવા નિર્વાણપ્રાપ્તી મહે. મોક્ષપ્રાપ્તીસાડી ત્રિરત્નાવી (सम्यक्दर्शन, सम्यक्ज्ञान, सम्यक्चारित्र) उपासना करून सर्वश्रेष्ठ ज्ञान अर्थात् केवलज्ञान प्राप्त करावे लागते. केवलज्ञानाची प्राप्ती आध्यात्मिक विकासाची सर्वोच्च अवस्था आहे. कालचक्राच्या ओघात केवलज्ञानाची प्राप्ती झालेले अनंत आत्मे होऊन गेले. केवलज्ञानाच्या प्राप्तीनंतर जे आत्मे मानवी देहाचे धारक असतात त्या सर्वांना 'अरिहंत' (अर्हत्) नावाने संबोधले जाते. या अरिहंतांपैकी ज्या व्यक्ती आपल्या प्रभावी धर्मोपदेशाने समाजाची नैतिक आणि आध्यात्मिक उन्नती करतात त्यांना तीर्थंकर' म्हणतात. सर्व तीर्थंकरांनी आपले उपदेश त्या काळातील व त्या त्या प्रदेशातील प्रचलित बोलीभाषांमध्ये केले. त्यामुळे ते सर्वसामान्यांना अतिशय जवळचे वाटले. या प्रभावी व्यक्तींचा ठसा कित्येक सहस्रके टिकून राहतो. वर्तमानकाळात भ. महावीर या तीर्थंकरांचा शासनकाळ चालू आहे. त्यांनी उपदेशलेली जी वाणी कालांतराने अर्धमागधी भाषेत ग्रंथबद्ध करण्यात आली तिला 'महावीरवाणी' असे संबोधण्याचा प्रघात आहे. ___ 'तीर्थंकर' शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे, 'तीर्थाचे कर्ते'. 'तीर्थ' शब्दाचा जैन परिभाषेनुसार मुख्य अर्थ आहे 'धर्म'. संसारसमुद्रातून आत्म्याला तारून नेणाऱ्या अहिंसा, सत्य आदि सद्गुणांचे जे प्रभावीपणे प्रवर्तन करतात, ते 'तीर्थंकर' होत. धर्मसंघाची सुदृढ स्थापना करणे, हे देखील या महापुरुषांचे कार्य असते. भ. महावीरांनी पार्श्वनाथप्रणीत धर्मामध्ये काळाला अनुरूप असे काही बदल करून जैन अथवा निग्रंथधर्माची पुन्हा एकदा उत्कृष्ट प्रभावना केली. २६०० वर्षे होऊन गेली तरीही भ. महावीरांच्या या कर्तृत्वाचा ठसा जैन समाजावर स्पष्टपणे उमटलेला आहे. तीर्थंकर हे तुमच्या-आमच्या सारखेच मानवी जन्मास येऊन आपल्या तपस्येने व साधनेने तीर्थंकर पदाला पोहोचलेले आत्मे आहेत. दुष्टांचे निर्दालन आणि सज्जनांचे रक्षण यासाठी खास करून अवतरित झालेले कोण्या परमात्म्याचे अथवा परमेश्वराचे अंश अथवा अवतार नव्हेत. केवलज्ञान प्राप्त केलेले सर्वच आत्मे निर्वाणानंतर लोकाकाशाच्या अग्रभागी सदैव सिद्धरूपाने विराजमान राहतात. त्यांचे चैतन्यमय अस्तित्व तेथे असते परंतु विश्वात पुनरागमन होत नाही. __ जैन धर्मात पूजनीय मानलेले हे सर्व तीर्थंकर क्षत्रिय कुळात जन्मलेले राजे होते. प्रत्येकांचे माता-पिता, जन्मस्थल, निर्वाणस्थल, त्यांच्या संघातील साधु-साध्वींची आणि श्रावक-श्राविकांची संख्या - इत्यादि तपशील जैन साहित्यात नोंदवलेले दिसतात. राज्यवैभव आणि राजपरिवाराचा स्वेच्छेने त्याग करून त्यांनी तपस्यामय जीवनाच
SR No.009841
Book TitleJain Vidyache Vividh Aayam Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorNalini Joshi
PublisherNalini Joshi
Publication Year2011
Total Pages28
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size109 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy