SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 12
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (६) जैनांचे पवित्र ग्रंथ अर्थात् (आम्नाय) : ___ जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर संप्रदायांनी वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथांना ‘आगम' अगर ‘आम्नाय' संबोधून पूजनीयतेचा दर्जा दिलेला दिसतो. आगम अगर आम्नायाने संबोधलेले ग्रंथ संख्येने अनेक आहेत. श्वात्मरांनी ते ४५ अगर ३२ मानलेले आहेत. दिगंबरांनी सुमारे १५-२० प्राचीन शौरसेनी ग्रंथांना आम्नायाचा दर्जा दिला आहे गीता, धम्मपद, कुराण, बायबल अगर गुरुग्रंथसाहेबसारखा सर्वमान्य लोकप्रिय असा एक ग्रंथ जैन परंपरेत नाही. आचार्य उमास्वामीकृत तत्त्वार्थसूत्र' हा संस्कृत सूत्रबद्ध दहा अध्यायात्मक ग्रंथ दोन्ही परंपरांना मान्य आहे. तथपि संपूर्ण दार्शनिक स्वरूप असलेला हा ग्रंथ लोकप्रिय ग्रंथांच्या वर्गवारीत बसू शकत नाही. समग्र श्वेतांबरीय साह्मिाकडे नजर टाकली असता 'उत्तराध्ययन' हा गाथाबद्ध ग्रंथ विषय व शैलीच्या दृष्टीने 'धम्मपदा'शी अतिशय जवळचा आहे असे दिसते. दिगंबरीय संप्रदायात 'षट्खंडागम' हा आद्य शौरसेनी ग्रंथ पूजनीय व पवित्र तर मानला गेला आहे परंतु लोकप्रियतेचे निकष त्याला लागू शकत नाहीत. 'कुंदकुंद' नावाच्या आचार्यांचे ‘समयसार', 'अष्टपाहुड' आणि द्वादशानुप्रेक्षा' हे ग्रंथ दिगंबर स्वाध्यायींकडून वाचले जातात. जैन तत्त्वज्ञान आणि आचाराचे समग्र आकलन नेटकेपणाने होण्यासाठी मात्र 'तत्त्वार्थसूत्र' या ग्रंथाला पर्याय उपलब्ध नाही. सामान्यतः ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या पर्युषणपर्वा'त श्वेतांबर संप्रदायात ‘कल्पसूत्र' व 'अंतगडदशासूत्र' वाचण्याचा प्रघात आहे. तर दिगंबर संप्रदायाचे लोक तत्त्वार्थसूत्रा'चा पाठ करतात. प्रथमानुयोग યા નાવાને પ્રસિદ્ધ બસસ્ટેન્ડી તીર્થકર કાઢીંવી પુરાણે વ વરિત્રે વાવMાવી પ્રથા સ્વાધ્યાયી નિરાંમધ્યે રૂદ્ધ માટે. श्वेतांबरांमध्ये सामायिक, प्रतिक्रमणाचा नित्यपाठ करण्याची रूढी आहे. दिगंबरांमध्ये देवपूजा, गुरूपास्ति,स्वाध्याय, संयम, तप आणि दान या सहा गोष्टींना नित्य आवश्यक मानले आहे. ___जैनांमध्ये काळानुसार अनेक संप्रदाय व उपसंप्रदाय निर्माण झाले. श्वेतांबर व दिगंबर हे दोन मुख्य संप्रदाय आहेत. वस्त्र, पात्र, आहारग्रहणाची पद्धत, पवित्र ग्रंथांसंबंधीची मान्यता इ. अनेक मुद्यांवरून, इसवीसनाच्या पहिल्या शतकाच्या सुमारास हे संप्रदाय एकमेकांपासून स्पष्टत: भिन्न झाले. श्वेतांबरांमध्ये काळाच्या ओघात विरमार्गी, स्थानकवासी व तेरापंथी हे उपसंप्रदाय निर्माण झाले. दिगंबरांमध्ये तेरापंथी, बीसपंथी, तारणपंथी आणि कांजवसमीपंथी आदि उपसंप्रदाय निर्माण झाले. विशेष असे की हे सर्व संप्रदाय व उपसंप्रदाय बाह्य आचारपद्धती व कर्मकांडावर आधारित आहेत. षद्रव्ये, नवतत्त्वे, कर्मसिद्धांत, अनेकान्तवाद, पंचमहाव्रते अशा तात्त्विक मुद्यांबाबत सर्व पंथोपपंथांची समान मान्यता आढळते. (७) जैन तत्त्वज्ञानाची संक्षिप्त ओळख : (अ) प्रस्तावना : ___भारतीय तत्त्वज्ञानांच्या प्रणालींना 'दर्शन' असे संबोधण्याचा प्रघात आहे. सांख्य-योग इत्यादी सहा दर्शने परंपरेने 'आस्तिक' मानली जातात. जैन आणि बौद्ध ही दोन दर्शने 'नास्तिक' आहेत. ती अशा अर्थाने की जगन्निम्या ईश्वराचे अस्तित्व त्यांनी मानलेले नाही. तसेच वेदवचनांचे अर्थात् श्रुतींचे प्रामाण्यही त्यांना मान्य नाही. भारतीय विद्येचे (Indology) अभ्यासक असे प्रतिपादन करतात की आर्यांच्या दुसऱ्या दलाचे भारतात आगमन होण्यापूर्वी भारतवर्षात वैराग्य, संन्यास व कठोर तपश्चर्येला महत्त्व देणारी श्रमण-परंपरा अस्तित्वात होती. जैन आणि बौद्ध धर्म त्या परंपरेतून विकसित झालेले धर्म आहेत. भ. महावीर आणि भ. गौतम बुद्ध यांचा कार्यकाळ इसवी सनापूर्वीचे सहावे शतक आहे. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म नव्याने विकसित केला. ते बौद्ध धर्माचे आद्य प्रवर्तक होते. याउलट भ. महावीर हे जैन धर्माचे २४ वे म्हणजे या युगातील अखेरचे तीर्थंकर होऊन गेले. त्यांच्या आधीच्या तेवीस तीर्थंकंकडून त्यांना प्रदीर्घ परंपरेने जैन धर्म, तत्त्वज्ञान आणि आचाराचा वारसा मिळाला होता. काळानुरूप योग्य ते बदल करून तो वारसा भ. महावीरांनी आपल्या धर्मोपदेशातून पुढे चालवला.
SR No.009841
Book TitleJain Vidyache Vividh Aayam Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorNalini Joshi
PublisherNalini Joshi
Publication Year2011
Total Pages28
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size109 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy